PM Modi आज समुद्राखाली ऑप्टिकल फायबर केबलचे उद्घाटन करणार

आत्मनिर्भर भारत यामध्ये अंदमान आणि निकोबार महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

pm modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अंदमान आणि निकोबार बेटांसाठी समुद्राच्या खाली अंडरवॉटर ऑप्टिकल फायबर केबल सुविधेचे उद्घाटन करतील. या ऑप्टिकल फायबरविषयी माहिती देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले होते की, ‘अंदमान आणि निकोबारला बाह्य जगाशी व्हर्च्युअर पद्धतीने संपर्क साधण्यासाठी अडचण होऊ नये हे सुनिश्चित करण्यासाठी आहे.’ ते पुढे म्हणाले की, ‘भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ कार्यक्रमात अंदमान आणि निकोबार महत्त्वाची भूमिका बजावतील.’

पंतप्रधान मोदी भाजप कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले, ‘हे बेट समूह रणनीतिकदृष्टा महत्त्वाचे आहे आणि जागतिक समुद्री व्यापाराचे एक महत्त्वपूर्ण केंद्र बनू शकते. केंद्र सरकार ‘ब्लू इकॉनॉमी हब’ आणि सागरी स्टार्ट अपसाठी महत्त्वाचे स्थान बनवण्यासाठी काम करत आहे.’

‘समुद्राशी आधारित आणि जैविक, नारळ आधारित उत्पादनांच्या व्यापाराला चालना देण्यासाठी अंदमान आणि निकोबारमधील १२ बेटांची उच्च-प्रभाव प्रकल्पांसाठी निवड केली आहे’, असे पंतप्रधानांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आणि नवीन भारताच्या प्रचारात हा प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावेल. पोर्ट ब्लेअर विमानतळाचा विस्तार करण्यासाठी आणि हवाई संपर्काला चालना देण्याच्या प्रकल्पांचा संर्दभ देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ‘परिसरातील ३०० किलोमीटर महामार्ग रेकॉर्ड टाईममध्ये तयार होतील.’


हेही वाचा – पंतप्रधानांनी केला आनंद व्यक्त; म्हणाले, १७ हजार कोटींचा निधी साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा