आता दहशतवादावर चर्चा नको तर कारवाईची गरज – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. भारतावर झालेल्या दहशत वादी हल्ल्याचा दक्षिण कोरियाने विरोध केला आहे. या भेटीदरम्यान पंतप्रधांनांना दक्षिण कोरियाकडून सेऊल शांतता पुरस्कारही देण्यात आला.

Seoul
Naredra Modi at korea
पंतप्रधान मोदींचा कोरिया दौरा

पंतप्रदान नरेंद्र मोदी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती मून-जे-इन यांनी ब्ल्यू हाउस येथे नरेंद्र मोदींचे स्वागत केले. यापूर्वी पंतप्रदान मोदींनी युद्धात मारले गेलेले ६५ हजार कोरियन सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. दशतवादावर चर्चा नको तर कारवाई करण्याची आवश्यकत असल्याचे मोदी म्हणाले. संपूर्ण जगाला एकत्र येऊन दहशतवादी प्रश्नांवर लढायला हवे असेही त्यांनी म्हटले. या भेटीदरम्यान पंतप्रधांनांना दक्षिण कोरियाकडून सेऊल शांतता पुरस्कारही देण्यात आला. भारत आणि दक्षिण कोरिया या दोन देशांमध्ये डिफेन्स सिस्टममुळे मैत्रीपूर्ण संबध वाढले आहेत.

“सेऊल शांतता पुरस्कारासाठी मी दक्षिण कोरियाला धन्यवाद देतो. मला आनंद आहे की हा पुरस्कार मला देण्यात आला. हा भारतासाठी एक गौरवाचा क्षण आहे. या अवार्ड बरोबर मला जी रक्कम मिळाली आहे ते १ कोटी ३० लाख रुपये मी नमामी गंगेला देतो आहे.” – नरेंद्र मोदी

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here