घरदेश-विदेशबिग-बी, किंग खानला मागे टाकत मोदी ठरले भारतातील पहिले आवडते पुरुष

बिग-बी, किंग खानला मागे टाकत मोदी ठरले भारतातील पहिले आवडते पुरुष

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सहावे सर्वात आवडते पुरुष ठरले आहेत. जगातील आवडत्या पुरुषांच्या यादीत बिल गेट्स अव्वल स्थानी

इंटरनेट आणि डेटा मार्केटिंग कंपनीने नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. या कंपनीचे नाव YouGov असून ऑनलाइन मतदानाच्या आधारे ही यादी तयार करण्यात आली आहे. या यादीनूसार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सहावे आवडते ठरले आहेत तर जगातील आवडत्या पुरुषांच्या यादीत बिल गेट्स नंबर एकच्या स्थानी आहेत. भारतातील अव्वल स्थानाचे नरेंद्र मोदी हे ठरले असून या बाबतीत बॉलिवूडचे बिग-बी अर्थात अमिताभ बच्चन आणि शाहरूख खानच्या देखील पुढे आहेत.

बिग बी अमिताभ बच्चन या यादीत १२ व्या स्थानी आहेत. याबरोबरच बॉलिवूडचे रोमांस किंग शाहरुख खान १६ व्या, तर सलमान खान १८ व्या स्थानी आहे. तर क्रिकेट विश्वातील सचिन तेंडूलकर, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचा देखील टॉप २० यादीत समावेश आहे.

- Advertisement -

पुरूषांप्रमाणे महिलांची यादी देखील YouGov या कंपनीने जाहीर केली आहे. या महिलांच्या यादीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा प्रथम स्थानी आहेत. महिलांच्या यादीमध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोणने प्रियांका चोप्राला मागे टाकत १३ वे स्थान पटकावले असून यंदा १४ व्या स्थानी प्रियांका चोप्रा आहे.

टॉप १० आवडते पुरुष

- Advertisement -

१. बिल गेट्स
२. बराक ओबामा
३. जैकी चैन
४. शी जिनपिंग
५. जॅक मा
६. नरेंद्र मोदी
७. रोनाल्डो
८. दलाई लामा
९. मेसी
१०. पुतिन

आवडत्या टॉप १० महिला

१. मिशेल ओबामा
२. ओपेरा विनफ्रे
३. एंजेलिना जॉली
४. क्वीन एलिझाबेथ-२
५. एम्मा वॉटसन
६. मलाला युसूफझाई
७. पेंग लियुआन
८. हिलरी क्लिंटन
९. तू यूयू
१०. टेलर स्विफ्ट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -