घरदेश-विदेशपरीक्षेला घाबरू नका, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा!

परीक्षेला घाबरू नका, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला

आयुष्यात सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास संघर्ष करून विजयी होता येते. परीक्षेतील गुण म्हणजे सर्व काही नाही. त्यामुळे परीक्षेला घाबरू नका. अपयशाबाबत घाबरण्यासारखं काहीच नाही. उलट त्यातूनच यशाचा मार्ग मोकळा होत असतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांशी बातचीत करताना म्हटले. विद्यार्थ्यांच्या मनात असलेली परीक्षेबद्दलची भीती दूर करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज त्यांच्याशी संवाद साधला. नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मोदी म्हणाले की, बिकट प्रसंगात संघर्ष करुन विजयी होता येतं, हे सांगताना मोदींनी क्रिकेटच्या मैदानातले उदाहरण दिले. २००१ मध्ये कोलकाता कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध राहुल द्रविड आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणनं केलेल्या खेळीची आठवण मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितली. आपल्या संघाला त्यावेळी लागोपाठ धक्के बसत होते. परिस्थिती आव्हानात्मक होती. पण त्या परिस्थितीत द्रविड आणि लक्ष्मणने केलेली कामगिरी कशी विसरता येईल? त्यांना संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलं,असं मोदी म्हणाले.

अनिल कुंबळेनं दुखापत झालेली असतानाही केलेली गोलंदाजी विसरता येण्यासारखी नाही. सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्यास अशा प्रकारे संघर्ष करता येतो, अशा शब्दांत मोदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. आयुष्यात येणार्‍या अपयशाला घाबरू नका, असं मोदी म्हणाले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी चांद्रयान-२ मोहिमेचेही उदाहरण दिले. चांद्रयान मोहिमेदरम्यान मला इस्रोच्या कार्यालयात न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण चांद्रयानचं लँडिंग यशस्वी होईल, याबद्दल कोणालाही खात्री नव्हती. पण तरीही मी तिथे गेलो, असे मोदींनी विद्यार्थ्यांना सांगितले.

- Advertisement -

पंतप्रधानांनी नव्या तंत्रज्ञानावर भाष्य केले. नवे तंत्रज्ञान आत्मसात करा. पण त्याच्या आहारी जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. तंत्रज्ञानावर तुम्ही नियंत्रण ठेवा. ते तंत्रज्ञान तुमच्यावर नियंत्रण ठेवेल, इतका त्याचा वापर करू नका. तंत्रज्ञानामुळे तुमचा वेळ उगाच खर्च होणार नाही, याची काळजी घ्या, सल्ला मोदींनी विद्यार्थ्यांना दिला. प्रत्येक घरात एक खोली तंत्रज्ञानमुक्त असायला हवी, असा विचार पंतप्रधानांनी मांडला. घरातली एक खोली गॅजेट्समुक्त असायला हवी, असं मोदी म्हणाले. विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळायला हवेत, असे त्यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -