घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्धव ठाकरेंना फोन

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना फोन करत त्यांचे आभार मानले आहेत. राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेने NDAच्या उमेदवाराला मतदान केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपचे संबंध सुधारण्याची शक्यता आहे. गुरूवारी झालेल्या राज्यसभेच्या उपसभापती निवडणुकीमध्ये शिवसेनेने पाठिंबा दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी अमित शहा यांनी देखील उद्धव ठाकरे यांना फोन करत राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीमध्ये पाठिंबा देण्याची विनंती केली होती. त्यानंतर शिवसेनेने एनडीएचे उमेदवार हरिवंश सिंग यांना मतदान केले होते. त्यानंतर आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करत आभार मानले आहे. शिवसेना यावेळी देखील अविश्वास ठरावाप्रमाणे तटस्थ राहिल किंवा विरोधात मतदान करेल असा विरोधकांचा कयास होता. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण यांना रिंगणात उतरवण्याचा विरोधकांचा डाव होता. पण, शिवसेनेने विरोधकांच्या मनसुब्यावर पूर्णपणे पाणी फेरले. अखेर शिवसेनेने हरिवंश सिंग यांच्याच पदरात आपली मते टाकली.

वाचा – अमित शहांसाठी मातोश्रीवर ‘आमरसा’ची मेजवानी

मैत्रि अतुट?

शिवसेना – भाजपची मैत्री २५ वर्षांपासून आहे. पण, २०१४ साली सत्तेत आल्यापासून भाजप शिवसेनेला दुय्यम वागणूक देत असल्याचा आरोप शिवसेनेकडून होत आहे. शिवाय, महत्त्वाच्या निर्णयांपासून शिवसेनेला लांब ठेवले जात असल्याचे देखील शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. परिणामी शिवसेना आणि भाजप नात्यांमध्ये दुरावा झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ‘सामना’तून देखील शिवसेनेने भाजवर वेळोवेळी निशाणा साधला आहे. मुंबई पालिका निवडणुकीमध्ये देखील दोन्ही पक्षांमध्ये असलेली दरी वाढताना दिसली. त्यानंतर आक्रमक होत उद्धव ठाकरे ‘युतीचा कटोरा घेऊन मी कुणाच्याही दारात उभा राहणार नाही’ असे म्हणत एकला चलोचा नारा दिला. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार शिवसेनेने व्यक्त केला. ‘सामना’तून देखील युती तुटल्याची भाषा वापरली गेली. परिणामी २५ वर्षांची युती तुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पण, आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना फोन केल्याने शिवसेना – भाजप युती कायम राहणार का? हे लवकरच स्पष्ट होईल.

- Advertisement -

अमित शहांची ‘मातोश्री’वारी

शिवसेनेची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड तब्बल अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर देखील शिवसेनेने एकला चलोचा नारा कायम ठेवला. ‘सामना’तून देखील त्याचा वारंवार उच्चार करण्यात आला. पण, अद्याप तरी शिवसेना सत्तेत असल्याने राजकीय वर्तुळात संभ्रम आहे.

वाचा – सेना-भाजप युती टिकवण्यासाठी अमित शहा मातोश्रीवर?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -