घरदेश-विदेशयूएईमध्ये पंतप्रधान मोदी ‘ऑर्डर ऑफ झायद’ने सन्मानित

यूएईमध्ये पंतप्रधान मोदी ‘ऑर्डर ऑफ झायद’ने सन्मानित

Subscribe

‘ऑर्डर ऑफ झायद’ पुरस्काराने सन्मानित होणारे मोदी पहिले भारतीय ठरले

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला दोन दिवसांचा फ्रान्सचा दौरा आटोपल्यानंतर आज अबुधाबीत पोहोचले. याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संयुक्त अरब अमिराती या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. मोदींना यूएईचा सर्वोच्च सन्मान ‘ऑर्डर ऑफ झायद’ मिळाला आहे. पंतप्रधान मोदींनी यूएईबरोबर द्विपक्षीय संबंध वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी पंतप्रधान मोदींनी हा पुरस्कार स्वीकारपुर्वी ‘यूएई’चे शासक यांच्यासोबत चर्चा देखील केली.

- Advertisement -

‘हा पुरस्कार फक्त माझा नाही, तर १.३ अब्ज भारतीयांचा आहे.’

यूएईचा ‘ऑर्डर ऑफ झायद’ या पुरस्काराने मोदींचा गौरव झाला असून, या पुरस्काराने सन्मानित होणारे मोदी पहिले भारतीय ठरले आहेत. या पुरस्काराबाबत मोदी म्हणाले की, “हा पुरस्कार फक्त माझा नाही, तर १.३ अब्ज भारतीयांचा आहे. यूएई आणि भारताच्या घनिष्ठ मैत्रीचा हा पुरावा आहे. दोन्ही देशातील सुरक्षा, शांतता आणि समृद्धीसाठी हे संबंध आवश्यक आहेत. भारत आणि यूएईच्या मैत्रीत कोणत्याही सीमेचं बंधन नाही”

यावेळी यूएईचे राजे प्रिन्स शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांची भेट घेतली. मोदी आज यूएईहून बहरीनला जाणार आहेत. बहरीनमध्ये मोदी एका प्राचीन मंदिराचे उद्धाटन करणार असून त्या ठिकाणी असणाऱ्या भारतीयांना संबोधित करणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींचे अबुधाबीत स्वागत झाल्यानंतर यूएईचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांची भेट घेतली. यावेळी मोदी म्हणाले, ‘भारत आणि यूएई यांचे संबंध अधिक दृढ होत आहेत. दुबईला खास शहर बनवण्यासाठी लाखो भारतीयांनी योगदान दिले असून ते आज या ठिकाणी सन्मानपूर्वक जीवन जगत आहेत.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -