घरताज्या घडामोडीपंतप्रधानांचा 'गंदगी मुक्त भारत' चा नारा, पण राहूल गांधी म्हणतात, आधी सत्य...

पंतप्रधानांचा ‘गंदगी मुक्त भारत’ चा नारा, पण राहूल गांधी म्हणतात, आधी सत्य सांगा!

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत राजघाट येथील गांधी स्मृती आणि दर्शन समिती येथे राष्ट्रीय स्वच्छता केंद्र स्वच्छ भारत मिशनसंबंधी अनुभवांच्या आदानप्रदान केंद्राचे उद्घाटन केले. महात्मा गांधी यांना श्रद्धांजली म्हणून समर्पित या राष्ट्रीय स्वच्छता केंद्राची घोषणा पंतप्रधानांनी १० एप्रिल २०१७ रोजी गांधीजींच्या चंपारण सत्याग्रह शताब्दी समारंभाच्या निमित्ताने केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचं उद्घाटन करताना अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्याचं आवाहन केलं.

राष्ट्रीय स्वच्छता केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी गांधीजींच्या नेतृत्वात झालेल्या भारत छोडो आंदोलनाविषयी भाष्य केलं. “देशाला कुमकुवत बनवणाऱ्या वाईट गोष्टींना भारतातून हद्दपार करण्यासारखी चांगली दुसरी कोणती गोष्ट आहे,” असं सांगत मोदी यांनी अस्वच्छतेला देशातून हद्दपार करण्यासाठी ‘भारत छोडो’चा नारा दिला.

- Advertisement -

राष्ट्रीय स्वच्छता केंद्र हे डिजिटल आणि बाह्य वास्तूंचे संतुलित मिश्रण असून यामध्ये भारताच्या परिवर्तनात्मक बदलाचे दर्शन घडवण्यात आले आहे. २०१४ मध्ये ५० कोटीहून अधिक लोक उघड्यावर शौचाला जात होते तेव्हापासून, २०१९ मध्ये उघड्यावरील शौचापासून मुक्त होण्यापर्यंतचा प्रवास उलगडला आहे.

- Advertisement -

राहूल गांधी यांचा मोदींना सवाल

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदींचं ट्विट रिट्विट केलं, आणि म्हटलं आहे की, “का नाही! आपल्याला एक पाऊल पुढे जाऊन देशात वाढत चाललेल्या असत्याची घाणही साफ करायची आहे. पंतप्रधान चीननं आक्रमणाविषयीचं सत्य देशाला सांगून या सत्याग्रहाची सुरू करणार का?,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.


हे ही वाचा – शेतकऱ्यांसाठी खुशखबर! रविवारी खात्यात जमा होणार प्रत्येकी २ हजार!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -