घरदेश-विदेशमोदीजी विष्णूचे ११वे अवतार; अवधुत वाघ यांची ट्विटरवर धुलाई

मोदीजी विष्णूचे ११वे अवतार; अवधुत वाघ यांची ट्विटरवर धुलाई

Subscribe

भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याच्या नादात भलतेच वक्तव्य केले आहे.

विष्णूचे अनेक अवतार आहेत, हे तुम्हाला माहिती असेलच. टीव्हीवर मालिकांमधून किंवा पुराण कथातून देखील आपण याबद्दल वाचलेले असेलच. पण तुम्हाला माहित आहे का? कलियुगात देखील विष्णूचा ११ वा अवतार आहे. आश्चर्यचकित झालात ना! पण हे कुणी ऋषीमुनी, तपस्वी, ज्योतिषी, बाबा-बुवा यांनी सांगितलेले नाही. ही ट्विटरवाणी केली आहे, भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी. नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार असल्याचे ट्विट त्यांनी केले आहे. हे ट्विट केल्यानंतर ट्विटरवर त्यांची येथेच्छ धुलाई सुरू असून अवधूत वाघ यांना जबरदस्त ट्रोल केले जात आहे.

- Advertisement -

मोदी आमच्यासाठी देवच – वाघ

आपल्या हिंदू संस्कृतीत ३३ कोटी देव आहेत, पंचमहाभुतं आहेत, भारतमातेला आपण देव मानतो. अगदी त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानसेवक असून, ते भारतमातेची सेवा ज्याप्रकारे करत आहेत, त्यामुळे आमच्यासाठी ते देवासमानच आहेत, असे वाघ यांनी म्हटले आहे. तसेच नरेंद्र मोदी हे सगळ्यांसाठी चांगले काम करत असल्यामुळे आम्ही त्यांना देवच मानत असल्याचे सांगत त्यात काहीही गैर नसल्याचेही त्यांनी सांगितले.

ट्विटरवर मात्र वाघ यांच्यावर टीका

भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विट केल्यानंतर काही वेळातच त्यावर शेकडो रिप्लाय आले आहेत. काही ट्विट तर खालच्या पातळीवर जाऊन वाघ यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. यातीलच काही मजेशीर ट्विट आम्ही इथे देत आहोत. अमित देसाई या नेटीझन्सने म्हटले आहे की तुम्ही स्वतःच दत्तगुरुचे अवतार आहात. तुम्ही असे ट्विट करत राहा.

- Advertisement -

सेक्रेड गेम्स या नेटफ्लिक्सच्या गाजलेल्या वेब सिरीजमध्ये नवाजुद्दीनचा एक डायलॉग चांगलाच प्रसिद्ध झाला होता. वाघ यांच्या ट्विटनंतर नवाजुद्दीनचा हाच डायलॉग मोदींच्या तोंडी घालत वाघ यांची खिल्ली उडवली गेली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -