Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ट्रम्प यांची टिवटिव बंद होताच मोदींचा वाढला भाव

ट्रम्प यांची टिवटिव बंद होताच मोदींचा वाढला भाव

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवरची टिवटिव बंद होताच मोदींचा चांगलाच भाव वाढला आहे.

Related Story

- Advertisement -

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची ट्विटरवरची टिवटिव बंद होताच मोदींचा चांगलाच भाव वाढला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ट्विटरवरुन हिसेंला चिथावणी देणारी वक्तव्ये सातत्याने होत होती. त्यामुळे ट्विटरने ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फॉलोअर्स वाढले असून ट्रम्प यांना देखील नरेंद्र मोदी यांनी मागे टाकले आहे.

राजकीय नेत्यांमध्ये मोदींचे अधिक फॉलोअर्स

- Advertisement -

राजकीय नेत्यांमध्ये जगातील सर्वात जास्त फॉलोअर्स अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे होते. मात्र, त्यांचे ट्विटर अकाऊंट बंद केल्यामुळे मोदींचे अधिक फॉलोअर्स वाढले आहेत. ट्विटरच्या फॉलोअर्समध्ये ट्रम्प हे पहिल्या क्रमांकावर होते. त्यांचे सर्वात अधिक म्हणजे ८ कोटी ८७ लाख इतके फॉलोअर्स होते. तर भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ६ कोटी ४७ लाख फॉलोअर्स होते. त्यामुळे मोदी यांचा ट्विटर फॉलोअर्समध्ये जगात दुसरा क्रमांक होता. मात्र, आता डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट बंद केल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्या क्रमांकावर आले आहेत.

- Advertisement -

दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर १२ कोटी ७९ लाख फॉलोअर्स आहेत. मात्र, ओबामा सध्या कोणत्याही राजकीय पदावर नाहीत. त्यामुळे मोदी हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन यांचे ट्विटरवर २ कोटी ३३ लाख फॉलोअर्स आहेत.


हेही वाचा – रतन टाटांचं उदाहरण देऊन संजय राऊतांची मोदींवर टीका


 

- Advertisement -