घरदेश-विदेशवाढदिवशी आईच्या भेटीसाठी पंतप्रधान मोदी अहमदाबाद दौऱ्यावर

वाढदिवशी आईच्या भेटीसाठी पंतप्रधान मोदी अहमदाबाद दौऱ्यावर

Subscribe

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने ते आपल्या आईचा आशीर्वाद घेण्यासाठी अहमदाबादला गेले आहेत. दरम्यान, गुजरात राज्याने त्यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या वाढदिवशी आईची भेट घेऊन तिचा आशीर्वाद घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत गुजरातच्या अहमदाबाद येथे दाखल झाले. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी विमानतळावर जाऊन नरेंद्र मोदींचे स्वागत केले. मोदी मंगळवारी सकाळी आपल्या आईच्या भेटीला जाणार आहेत. त्यानंतर सकाळी आठ वाजेच्या सुमारास केवडियाला पोहोचणार आहेत. तिथे नर्मदा धरणाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी साडे नऊ वाजता नर्मदा पूजनाचा कार्यक्रम आहे. साधारणतः दहा वाजेच्या सुमारास मोदी गरूडेश्वर येथील दत्त मंदिराची पूजा करतील. आज मोदी सरदार सरोवराची देखील पाहणी करणार आहेत. तिथल्या धरणाची ते पाहणी करणार आहेत. धरण गेल्या दोन वर्षांपासून इतके भरले नव्हते.

- Advertisement -

हेही वाचा – काश्मीरमधील परिस्थितीचा अहवाल सादर करा – सुप्रीम कोर्ट


 

- Advertisement -

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून वाढदिवस साजरी करण्याचे ट्वीट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाबाबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी ट्वीट करत माहिती दिली होती. त्याचबरोबर नरेंद्र मोदींच्या जन्मदिनी केवाडिया येथे होणाऱ्या नमामी देवी नर्मदा महोत्सवात आपण त्यांच्या स्वागतासाठी तयार असल्याचे म्हटले होते. या महोत्सवात नर्मदा आरतीची देखील तयारी करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -