घरदेश-विदेशमोदींची वर्षातील अखेरची 'मन की बात'

मोदींची वर्षातील अखेरची ‘मन की बात’

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज वर्षातील अखेरची 'मन की बात'

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचा आज ५१ वा भाग असून या वर्षातील मोदींचा हा अखेरचा कार्यक्रम आहे. पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाध साधतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून पद स्विकारल्यानंतर त्या वर्षी ५ ऑक्टोबर २०१४ रोजी ‘मन की बात’ कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. या कार्यक्रमाला आज ५१ भाग पूर्ण झाले आहेत. देशातील जनतेशी रेडिओच्या माध्यमातून संवाद साधण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘मन की बात’

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी हे प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. देशातील असंख्य जनतेशी ते रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायचे आणि जनतेने विचारलेल्या प्रश्नांना देखील ते उत्तर द्यायचे. यापूर्वी २५ नोव्हेंबर रोजी ५० व्या भागात पंतप्रधान मोदींनी संविधान दिवस आणि गुरुनानक जयंतीशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण गोष्टींबर ‘मन की बात’ केली होती.

- Advertisement -

रेडिओचे वाटप

उत्तराखंडामध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) कार्यकर्त्यांना रेडिओचे वाटप करण्यात आले आहे. जेणेकरून जनता पंतप्रधानाशी संवाद साधू शकेल याकरता उत्तराखंडामध्ये रेडिओचे वाटप करण्यात आले आहे.


वाचा – मोदी नटसम्राट, त्यांना ऑस्कर द्या; जिग्नेश मेवाणीची टीका

- Advertisement -

वाचा – मोदी ठरले सर्वात महागडे पंतप्रधान


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -