घरदेश-विदेशइतरांच्या जिवासाठी योद्ध्यांनी स्वत:चा जीव वेचला, लसीकरणाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी भाऊक

इतरांच्या जिवासाठी योद्ध्यांनी स्वत:चा जीव वेचला, लसीकरणाच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी भाऊक

Subscribe

जगाला हादरवून टाकणार्‍या कोरोना संसर्गाने भारतालाही संकटात टाकले होते. या संसर्गात लाखो लोकांचा जीव गेला. पण आता कोरोना व्हायरसला रोखण्याचे दिवस सुरू झाले आहेत.संपूर्ण देशभरात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्त बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊक झाले. ते म्हणाले ‘मी आजच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो. कोरोना लस आली असून लस विकसित करणार्‍यांनी खूप कष्ट घेतले आहेत. त्यांनी कोणत्या सणाची चिंता केली ना घरी सुट्टीची मजा घेतली, हे सांगताना पंतप्रधान मोदी यांचे डोळे पाणावले.

राष्ट्रकवि दिनकर यांची आठवण करून देताना मोदी म्हणाले, ‘मानव जब जोर लगाता है तो पत्थर पानी बन जाता है.’
या लसीकरण मोहिमेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात कोरोनाशी लढताना प्राण गमावलेल्यांची आठवण काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊक झाले. ते म्हणाले, ‘आपले डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर, आशा वर्कर, सफाई कर्मचारी, पोलीस आणि दुसरे फ्रंटलाईन वर्कर यांनी मानवता प्रति आपल्या दायित्वाला प्राथमिकता दिली. यामध्ये काहीजण आपल्या कुटुंबियांपासून दूर राहिले, कित्येक दिवस ते घरीच गेले नाहीत. तर शेकडो योद्धे असे आहेत, जे घरी कधीच परतले नाहीत. त्यांनी प्रत्येकाचा जीव वाचवण्यासाठी आपल्या जीवाची आहुती दिली. यामुळे कोरोनाचा पहिला डोस आरोग्य कर्मचार्‍यांना देऊन समाज कृतज्ञता व्यक्त करत आहे. इतिहासात अनेक संकट आणि महामारी आली. पण कोरोनासारख्या संकटाची कुणीही कल्पना केली नव्हती. कोरोनाचा अनुभव हा विज्ञानालाही नव्हता आणि समाजालाही.’

- Advertisement -

दुसर्‍या टप्प्यात ३० कोटींना लस

‘लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ३ कोटी कोरोना योद्धांना लस देण्यात येणार आहे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यात ३० कोटी नागरिकांना लस दिली जाईल. तसेच ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्यांनाही दुसर्‍या टप्प्यात लस दिली जाईल. ३० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेले अमेरिका, भारत आणि चीन असे तीनच देश आहेत’, असे मोदी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -