घरदेश-विदेशभूमिपूजन मी केले, उद्धाटन सुद्धा मीच करणार - नरेंद्र मोदी

भूमिपूजन मी केले, उद्धाटन सुद्धा मीच करणार – नरेंद्र मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरच्या लेह दौऱ्यावर आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल शासन लागून झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. पंतप्रधानांच्या हस्ते लेहच्या नवीन विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगचे भूमिपूजन करण्यात आले. दरम्यान, यावेळी उपस्थित लोकांना संबोधित करताना मोदी असे म्हणाले की, ‘टर्मिनल बिल्डिंगचे भूमीपूजन मी केले, तुमचा आशिर्वाद मिळाला तर उद्घाटन करायला सुध्दा मी येईल.’ मोदींच्या या वक्तांचा इशारा थेट २०१९ च्या लोकसभा निवडणूक जिंकण्याकडे जात आहे.

- Advertisement -

मीच उद्घाटन करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे म्हटले आहे की, ‘ गेल्या तीन दशकापूर्वी विमानतळाची जी टर्मिनल बिल्डिंग बनवली गेली होती. वेळेनुसार त्या बिल्डिंगच्या आधुनिकीकरणाकडे लक्ष दिले गेले नाही. आज नवीन बिल्डिंगचे भूमीपूजन झाले आहे लवकरच या बिल्डिंगचे उद्घाटन देखील होईल. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की, ज्या बिल्डिंगचे भूमीपूजन मी केले, त्याचे उद्धाटन देखील मी करायला येईल.’

- Advertisement -

मी देशाचा कानाकोपरा फिरलो

मोदी पुढे असे म्हणाले की, ‘लेह-लडाख आणि कारगिलच्या विकासासाठी केंद्र सरकार काहीच कसर सोडणार नाही. मी देशाचा असा पंतप्रधान आहे जो भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात फिरुन आला आहे. प्रत्येक अधिकाऱ्यांकडून बारीक गोष्टी जाणून घेत असतो. मात्र मला अनुभव असतो. ‘

लेह-दिल्लीतले अंतर कमी होणार

‘बालासपूर-मनाली-लेह रेल्वे सेवेवर सर्वे झाला आहे. काही ठिकाणी काम सुरु झाले आहे. रेल्वे मार्ग झाल्यानंतर लेह आणि दिल्ली यामधील अंतर खूप कमी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे सांगितले की, मला मिळालेल्या माहितीनुसार लेह-लडाखमध्ये ३ लाख पर्यटक आले. जवळपास १ लाख कारगिलमध्ये गेले होते. म्हणजे काश्मिरमध्ये आलेल्या पर्यटकांपैकी आर्धे पर्यटक लेहला आले. लवकरच लेह-लडाख आणि कारगिलच्या परिसरात आम्ही पर्यटन स्थळ उभारणार’ असल्याचे मोदींनी सांगितले.

मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२० केव्हीच्या ट्रान्समिशन लाईनचे उद्घाटन केले. ज्यामुळे बर्फवृष्टीतही प्रत्येक घरामध्ये वीज पुरवठा होईल. या व्यतिरिक्त नविन पर्यटन आणि ट्रेकिंग मार्गाचे उद्धाटन केले. पंतप्रधानांनी ४८० कोटी खर्च करुन तयार करण्यात आलेल्या लेब एअरपोर्टच्या टर्मिनल बिल्डिंगचे भूमिपूजन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -