घरताज्या घडामोडीमोदी सरकारच्या 'या' प्रोजेक्टमुळे गरिबांना सोयीस्कर आणि सहज मिळणार घरे

मोदी सरकारच्या ‘या’ प्रोजेक्टमुळे गरिबांना सोयीस्कर आणि सहज मिळणार घरे

Subscribe

देशातली सर्व बेघर कुटुंबाना २०२२ पर्यंत पक्की घरे देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लाईट हाउस प्रोजेक्टचे उद्घाटन केले. नव्या वर्षातील पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला संबोधित करताना मोदी म्हणाले की, ‘आज मध्यमवर्गीयसाठी घर तयार करण्यासाठी एक नवीन तंत्र मिळत आहे. हे ६ ‘लाईट हाउस प्रोजेक्ट’ देशातील घरांच्या बांधकामाला दिशा दाखवेल. हे ‘लाईट हाउस प्रोजेक्ट’ आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तयार होईल. हे अधिक मजबूत असून यामुळे गरिबांना सोयीस्कर आणि सहज घर मिळेल. एक काळ असा होतो की बांधकाम करणे हे सरकारचे प्राधान्य नव्हते, परंतु आता याला बदलले आहे. गृहनिर्माण देखील स्टार्ट अप प्रमाणेच सुरळीत होईल.’

लाईट हाउस प्रोजेक्ट अंतर्गत देशात ६ शहरात ३६५ दिवसात १ हजार घरे तयार केली जाणार आहेत. म्हणजेच याच अर्थ असा की, दररोज अडीच ते तीन घरे तयार होतील. त्यामुळे मोदींनी इंजिनिअर, विद्यार्थी आणि प्रोफेसरना आवाहन केले आहे की, ‘या साइटवर जा आणि या प्रोजेक्टचा अभ्यास करा. या सर्व प्रोजेक्टसाठी परदेशातील तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन अभ्यास करा आणि पाहा हे भारतासाठी योग्य आहे का? की यात काही सुधारणा होण्यास वाव आहे.’

- Advertisement -

नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ वाजता ६ राज्यांमध्ये ६ ‘लाईट हाउस प्रोजेक्ट’ची पायाभरणी झाली. दरम्यान जागतिक गृहनिर्माण बांधकाम तंत्रज्ञान स्पर्धा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते त्रिपुरा, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये लाईट हाउस प्रोजेक्टची पायाभरणी केली गेली आहे.


हेही वाचा – नववर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG Cylinder महागले; बघा वाढलेले दर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -