घरदेश-विदेशमोठी घडामोड: मोदी हे मोहन भागवत तर भैयाजी जोशी नितीन गडकरींच्या भेटीला

मोठी घडामोड: मोदी हे मोहन भागवत तर भैयाजी जोशी नितीन गडकरींच्या भेटीला

Subscribe

सतराव्या लोकसभेच्या निकालाला अवघे काही दिवस राहिले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. एका वृत्तपत्राच्या संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार मोदी नागपूर येथील संघमुख्यालयात भागवत यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे. दुसऱ्या बाजूला संघाचे सरकार्यवाह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.

भाजप पक्षाच्या राजकारणात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा नेहमीच वरचष्मा पाहायला मिळाला आहे. मोदी हे स्वतः एकेकाळी स्वंयसेवक होते. मात्र संघाच्या आदेशानंतर त्यांनी गुजरातच्या राजकारणात प्रवेश केला होता. २०१४ साली संघाने मोदींना पाठिंबा दिल्यामुळेच एनडीएचा भारी बहुमताने विजय झाला होता. मात्र मागच्या काही काळापासून मोदी यांनी संघापासून दूर राहणे पसंत केले होते. आज जर त्यांची संघ मुख्यालयात भेट झाली तर ती मागच्या चार वर्षातील पहिलीच भेट ठरेल.

- Advertisement -

हे वाचा – Lok Sabha Exit Poll India: सत्तेच्या चाव्या पुन्हा मोदींकडे?

२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपला पुर्ण बहुमत मिळाले नाही, तर मोदी यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग खडतर असल्याचे अनेक लोकांनी बोलून दाखवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाजपला बहुमत न मिळाल्यास आणि आघाडीचे सरकार बनवण्याची वेळ आल्यास मोदी पंतप्रधान होणार नाहीत, असे सांगितले होते. त्यामुळेच जर बहुमत मिळाले नाही, तर पक्षाची रणनिती काय असून शकते? यावर कदाचित मोदी आणि भागवत यांच्यामध्ये चर्चा होऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे.

- Advertisement -

दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे जर पंतप्रधानपदाचे दावेदार नसतील तर दुसरा कोणता नेता असेल? यावर सातत्याने चर्चा केली गेली आहे. यावेळी वारंवार नितीन गडकरी यांचे नाव पुढे आले. मात्र स्वतः नितीन गडकरी यांनी या चर्चांना फेटाळले आहे. ‘पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार मी काम करणार’, अशी शिस्तप्रिय भूमिकाही त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. मात्र आता मोदी आणि मोहन भागवत यांची संभाव्य भेट होण्याआधीच संघाचे कार्यवाह भैयाजी जोशी यांनी गडकरी वाड्यावर जाऊन गडकरी यांची भेट घेतली असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -