घरCORONA UPDATEकोरोनासोबतच अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं लागणार - पंतप्रधान

कोरोनासोबतच अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं लागणार – पंतप्रधान

Subscribe

‘जगासोबतच भारतात आज कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे आपल्याला कोरोना विषाणूशी तर लढायचं आहेच. पण त्यासोबतच आपल्याला अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेकडेही लक्ष द्यावं लागणार आहे’, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज साधलेल्या ऑनलाईन संवादात मांडली. भारतीय उद्योग संघ अर्थात CII ला १२५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा ऑनलाईन संवाद साधला. या संवादात देशाच्या उद्योग क्षेत्रातले अनेक दिग्गज उपस्थित होते. ‘या देशाची क्षमता, प्रतिभा आणि तंत्रज्ञानावर माझा विश्वास आहे. भारतीय अर्थव्यवस्था निश्चितच विकासाच्या मार्गावर परतेल’, असा विश्वास यावेळी पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी कोरोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि त्यासंदर्भात केंद्र सरकारने केलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजना यांची माहिती मोदींनी दिली. ‘कोरोनामुळे देशाला दोन महिन्यांहून जास्त काळ लॉकडाऊनमध्ये जावं लागलं. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग धीमा झाला आहे हे निश्चित. पण आता आपण लॉकडाऊनमधून अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात आलो आहोत. कोरोनाचं थैमान सुरू झालं, तेव्हा भारतानं वेळीच लॉकडाऊन लागू केला. आवश्यक त्या सुविधांमध्ये वाढ केली. सद्य घडीला जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था बऱ्या स्थितीत आहे. मात्र, ती अर्थव्यवस्था मजबूत करणं हे सरकारचं प्राधान्य असेल’, असं मोदी यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -