‘आता बघतोच कसे वाचता ते’, मोदींचा गांधी परिवाराला इशारा

Sumerpur
Narendra Modi in Sumerpur
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुमेरपूर (राजस्थान) येथे सभा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा घेत आहेत. यानिमित्ताने त्यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर टीकेच झोड उठवली. नॅशनल हेराल्ड प्रकरण आणि ऑगुस्टा वेस्टलँड प्रकरणातून गांधी परिवार कसा वाचतो, हेच मी बघणार आहे, असे आव्हानच मोदी यांनी सभेद्वारे दिले आहे. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सुप्रीम कोर्टाने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या प्राप्तिकराची चौकशी करण्याची मंजुरी दिली आहे. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात जिंकलो असून “आता कसे वाचतात, ते बघतोच”, अशी तंबीच मोदी यांनी दिली आहे.

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा : क्रिश्चियन मिशेलचे दुबईतून प्रत्यार्पण

देशात पाच राज्यांच्या निवडणुका होऊ घातल्यामुळे राष्ट्रीय राजकारणातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. एकमेकांवर टीका-टीप्पणी करण्यात राजकारणी मश्गूल आहेत. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थान मधील सुमेरपूर येथील प्रचार सभेत गांधी परिवारावर निशाणा साधला. या सभेत ते म्हणाले की, “मी २०१४ च्या निवडणूकीत ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याबाबत बोललो होतो. देशात व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरचा हजारो कोटींचा घोटाळा झाला होता. आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व कागदपत्रे, फाईल एकत्र केल्या आणि त्यातून एक दलाल (ख्रिस्तियन मायकल) आमच्या हातात आला आहे. आम्ही त्याला दुबईहून भारतात आणण्यात यशस्वी झालो आहोत. हा दलाल आता नवनवीन गुपिते सरकारसमोर उघड करेल. त्यामुळे हे प्रकरण कुठपर्यंत जाते, ते पहावे लागेल.”, असे मोदी म्हणाले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here