घरदेश-विदेशदहशतवाद्यांच्या आयईडी पेक्षाही व्होटर आयडी जास्त शक्तिशाली - मोदी

दहशतवाद्यांच्या आयईडी पेक्षाही व्होटर आयडी जास्त शक्तिशाली – मोदी

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर माध्यमांशी बोलताना मोदींनी सांगितलं की, 'दहशतवाद्यांच्या आयईडी पेक्षाही व्होटर आयडी जास्त शक्तिशाली आहे.'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. आज सकाळी अहमदाबादच्या रानिप मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले. मतदान केल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली. या प्रतिक्रियेत त्यांनी देशातील जनतेला मतदानाचे आवाहन केले. याशिवाय ते म्हणाले की, ‘दहशतवाद्यांचे प्रमुख शस्त्र आयईडी असते, तर लोकशाहीचे प्रमुख शस्त्र व्होटर आयडी आहे. व्होटर आयडी हे आयईडी पेक्षा जास्त शक्तिशाली असते.’

नेमके काय म्हणाले मोदी?

नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘आज देशात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. लोकशाहीच्या या पवित्र पर्वात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. कुंभमेळ्यात गंगास्नान करुन जसा पवित्रतेचा अनुभव येतो अगदी तसाच पवित्रतेचा अनुभव लोकशाहीत मतदान केल्यावर येतो. मी देशातील सर्व मतदारांना आवाहन करतो की, प्रत्येकाने उत्साहात या मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे.’ यापुढे ते म्हणाले की, ‘देशात स्थिर सरकार निर्माण होण्यासाठी नवमतदारांची प्रमुख भूमिका असेल.’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -