घरदेश-विदेश'वाईट हेतू ठेवून देशसेवेचे काम करणार नाही'

‘वाईट हेतू ठेवून देशसेवेचे काम करणार नाही’

Subscribe

धन्यवाद सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन

आगामी काळात देशाची सेवा करण्यासाठी, ‘मी वाईट हेतूने कुठलेच काम करणार नाही, मी स्वत:साठी काहीच करणार नाही. माझ्या वेळेचा आणि शरीराचा प्रत्येक हिस्सा केवळ देशवासियांसाठी. या तीन निकषांवर माझे मूल्यांकन करा, काही कमतरता राहत असेल, तर माझी कानउघडणीही करा, असे भावूक उदगार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढलेलोकसभा २०१९ मध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर दिल्लीत भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या विजयाचे श्रेय देशातील नागरिकांना दिले.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी 

आज सर्व या विजयोत्सवात सामील झाले आहेत. २०१९ लोकसभेचा जनादेश सर्व देशवासियांसाठी नव्या भारतासाठी जनादेश घेण्यासाठी गेलो होते. आम्ही बघतोय देशातील कोटी कोटी नागरिकांनी आमची झोळी भरली. मी भारताच्या १३० कोटी नागरिकांचा डोक टेकवून नमन करतो. ही जगातील सर्वात मोठी घटना आहे. देश स्वतंत्र झाला. इतके लोकसभेचे निवडणूक झाले पण इतक्या निवडणूकीत सर्वाधित मतदान यावेळी झाले. तेही ४० ४२ डि. उष्णतेत भारतातील मतदारांची जागृकता. लोकतंत्रासाठी भारतची निष्ठा. जगाला या गोष्टीही दखल घ्यायला लावली. याचे औचित्य साधून लोकतंत्रच्या उत्सवात ज्यांनी ज्यांनी बलिदान दिले. जे जखमी झालेत. त्यांच्या कुटुंबियांसाठी संवेदना व्यक्त करतो. लोकतंत्रच्या इतिहासात लोकतंत्रासाठी मरण हे येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी असेल. मी निवडणूक आयोगाला, सुरक्षा दलाला, सर्वांना उत्तमरित्या लोकतंत्रांत विश्वास बनवण्यासाठी व्यवस्था देण्यासाठी हृदयापासून बधाई देतो. जेव्हा महाभारत संपले तेव्हा कृष्णाला विचारलं की तुम्ही कोणा बाजूने होता. त्यावेळी कृष्णाने जे सांगितले ते २०१९ च्या निवडणुकीत जनतेने कृष्णाच्या रुपात उत्तर दिले आहे. लोकांनी भारतासाठी मतदान केले. म्हणूनच देशातील सामान्य नागरिक ही भावना भारताच्या उज्वल भविष्याची खात्री आहे. या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून सांगत होतो. ही निवडणूक देशाची जनता लढतेय. कोणी नेता नाही, कोणी राजकीय पक्ष नाही. आज माझ्या भावनेला जनतेने प्रकट केले. जर कोणी जिंकलय तर हिंदुस्थान झालाय. लोकतंत्र विजयी जिंकलय. जनता जिंकलीय. भाजप जनतेच्या चरणी हा विजय समर्पित करतो. या निवडणुकीत जे जिंकले त्या सगळ्यांना शुभेच्छा. कोणत्याही पक्षाचे असो. देशाच्या उज्वल भविष्यासाठी विजयी सर्व प्रतिनिधी येणाऱ्या दिवसात देशाची सेवा करतील यासाठी शुभेच्छा देतो. कोटी कोटी कार्यकर्ता फक्त एकच भावना. भारतमाता की जय दुसरं काही नाही. हे कार्यकर्ता भाजपचा प्रत्येक नेता यशाचे वाटेकरी आहेत.

- Advertisement -

#LIVE: विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासियांशी संवाद!

#LIVE: विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा देशवासियांशी संवाद!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಮೇ 23, 2019

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -