काँग्रेस टायटॅनिकसारखा बुडणारा पक्ष – नरेंद्र मोदी

Nanded
pm naredra modi
पंतप्रधान मोदींचा सूचक इशारा

“काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. दिवसेंदिवस हे जहाज बुडत चालले आहे. या जहाजात जो बसेल तो राष्ट्रवादी पक्षा सारखा बुडत जाईल”, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नांदेड येथील सभेत केली. ‘शरद पवार आणि त्यांचे सहकारी प्रफुल पटेल यावेळी निवडणूक लढवत नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीचे जेवढे आमदार आहेत, त्यापेक्षा त्यांच्यामध्ये गट-तट आहेत. या गटा-तटातील लोक देशाचा नाहीतर स्वतःचा विचार करत आहेत. त्यामुळे यांना निवडून देणार का?’, असे देखील मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नांदेड येथे महाराष्ट्रातील तिसरी सभा घेतली. आधीच्या दोन सभेप्रमाणे या सभेतही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर तोंडसूख घेतले. आपल्या भाषणाच्या सुरुवातील पंतप्रधानांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना सांगितले की, “काँग्रेसला दोन पंतप्रधान हवे आहेत. एक दिल्लीत आणि दुसरा जम्मू-काश्मीरमध्ये. काँग्रेस सोबत आघाडीत असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुला देशात दोन पंतप्रधान असावेत, असे जाहीरपणे बोलत आहेत. देशाला दोन पंतप्रधानांची काय गरज?”, असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला.

तसेच राहुल गांधी यांनी मायक्रोस्कोप घेऊन मतदारसंघ शोधला. शोधला तर शोधला असा की देशातील मॅजोरीटी त्या ठिकाणी मायनोरीटीमध्ये आहे, असा मतदारसंघ शोधला. मी यानिमित्ताने अमेठीच्या जनतेला सांगू इच्छितो की तुम्ही आजपर्यंत ज्यांना पाठिंबा दिला, त्याने तुम्हाला दगा दिला आहे. त्यामुळे यावेळी राहुल गांधींना अमेठीच्या जनतेने धडा शिकवावा, असेही मोदी म्हणाले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here