पंतप्रधानांनी केला आनंद व्यक्त; म्हणाले, १७ हजार कोटींचा निधी साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

nirmala sitharaman briefs on garib kalyan rojgar abhiyaan
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मन की बात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दीड वर्षात ७५ हजार कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा झाल्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. त्यातील २२ हजार कोटी रुपये हे लॉकडाउनच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले, असेही पंतप्रधानांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या रुपाने १७ हजार कोटी रुपये जमा झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी क्षेत्राच्या पायाभूत सेवा सुविधांसाठीच्या आर्थिक तरतुदींची घोषणा केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी पीएम-किसान योजने अंतर्गत विविध घोषणा करण्यात आल्या आहेत.

शेतकरी समित्या, FPOs यांना गोदामं तयार करण्यासाठी, कोल्ड स्टोअरेज उभारण्यासाठी, फूड प्रोसेसिंग उद्योगांसाठी १ लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याआधी e-NAM द्वारे एक उत्कृष्ट व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आता कायदा तयार करून शेतकऱ्याला बाजाराच्या वर्तुळातून आणि बाजाराला कराच्या वर्तुळातून मुक्त केले जाईल. या निर्णयामुळे शेतकरी त्याच्या शेतात येणाऱ्या उत्पादनांचा थेट सौदा करु शकतो. एवढेच नाही तर सरळ गोदामे, e-NAM शी जोडल्या गेलेल्या संस्था, व्यापारी जे त्याला जास्त किंमत देतील त्यांच्याशी पिकाचा सौदा करु शकतो, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

हेही वाचा –

‘मुख्यमंत्री ठाकरेंचा एकेरी उल्लेख, सरकार काय करतंय’; पवारांचा राऊतांना फोन