घरदेश-विदेशबुलंदशहरमधील हिंसाचाराचा मुख्य आरोपी अटकेत

बुलंदशहरमधील हिंसाचाराचा मुख्य आरोपी अटकेत

Subscribe

बुलंदशहरमधील दंगलीच्यामुख्य सुत्रदाराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या सुत्रदाराबरोबरच पोलिसांनी त्याच्या तीन सहकाऱ्यांनाही अटक केली आहे.

गोहत्येच्या संशयावरुन उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये दंगल उसळली होती. या दंगलीमध्ये पोलीस उपनिरिक्षक सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ८७ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर या दंगलीमागील मुख्य सुत्रधार योगेश राज या तरुणाला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. योगेश सोबतच पोलिसांनी त्याच्या तीन सहकाऱ्यांना अटक केली आहे. योगेश राज हा बजरंग दलाचा नेता असून तो प्रवीण तोगडीया यांच्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष आहे.

हेही वाचा – ‘आज दंगलीत माझे वडील गेले, उद्या कुणाचे वडील जातील?’

- Advertisement -

योगेशने फेटाळले आरोप

योगेश राज याने गोहत्या बाबतीत पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत जमावाला भडकवले, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. परंतु, योगेशने हे आरोप फेटाळले आहेत. अटकपूर्वी प्रतिक्रिया देताना त्याने म्हटले की, मी घटनास्थळी होतो. परंतु, मी जमावाला भडकावलेले नाही. हिंसाचार घडवणे हा आमचा उद्देश नव्हता, असेही त्याने म्हटले आहे.

काय आहे प्रकरण?

बुलंदशहरमध्ये गेले तीन दिवस धार्मिक कार्यक्रम सुरु होता. दरम्यान, बुलंदशहर जिल्ह्यातील एका गावात शेतामध्ये मृत गायीचे अवशेष सापडले. त्यामुळे काही लोकांनी गोहत्या करण्यात आली असल्याची माहिती सगळीकडे पसरवली. ही बाब माहित पळताच संतप्त झालेल्या जमावाने रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाला थांबवण्यासाठी घटनास्थळी पोलीस दाखल झाले. पोलीसांनी या आंदोलकांना रस्त्यावरुन बाजू होण्यास सांगितले. परंतु, पोलिसांच्या कुठल्याही गोष्टी आंदोलकांनी एकल्या नाहीत. त्यामुळे पोलीस आणि आंदोलक दोघांमध्ये वादावादी झाली. जमाव पोलीसांवर चालून गेला. अखेर पोलसांना जमावावर गोळीबार करावा लागला. या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला. त्यानंतर या जमावाने पोलिस ठाण्यावर हल्ला केला. त्यांनी पोलीस ठाण्याची तोडफोड आणि जाळपोळ केली. जमावाने केलेल्या या हल्यात पोलीस उपनिरिक्षक सुबोध कुमार सिंह यांचा मृत्यू झाला.

- Advertisement -

हेही वाचा – राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचे कारस्थान – राज ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -