घरदेश-विदेशकोलकात्यात सापडले घातक पदार्थ

कोलकात्यात सापडले घातक पदार्थ

Subscribe

पोलिसांना या संदर्भातील माहिती कळताच आरोपींना वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली. शिवाय आरोपींकडून वनविभागाचे एक नेमणूक पत्र सापडले. जे तपासाअंती खोटे असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे आता या आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

कोलकत्यामध्ये पोलिसांनी घातक पदार्थ बाळगणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. अटक व्यक्तींकडून घातक असे युरेनिअम जप्त करण्यात आले आहेत. यांची किंमत ३ कोटी रुपये असल्याचे कळत आहेत. मध्य कोलकातामधील मँगो लेन परीसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

प्लास्टिक पिशवीत होते ‘युरेनिअम’

एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे युरेनिअम होते. जावेद मैनादाद, एस के मुघल युनुस बिस्वास, शहाजान मोंडल, बसंत सिंग अशी अटक केलेल्यांची नावे असून या पाच जणांकडून हस्तगत केलेल्या युरेनिअमच्या पाकीटावर त्याचा बॅच क्रमांक आणि एक्पायरी डेटचा उल्लेख केलेला होता. पोलिसांना या संदर्भातील माहिती कळताच आरोपींना वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आली.हे युरेनिअम ३ कोटी रुपयांचे असल्याची माहिती कोलकाता पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

नेमणूकपत्रही खोटे

आरोपींकडून वनविभागाचे एक नेमणूक पत्र सापडले. जे तपासाअंती खोटे असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे आता या आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -