जेएनयू प्रकरण: तीन वर्षानंतर १२०० पानी चार्जशीट दाखल

याप्रकरणात ३० आणखी लोकं संशयित आहेत. मात्र त्यांच्याविरोधात पुरावे मिळाले नाहीत. पोलिसांनी १२०० पानांची चार्जशीट बनवली आहे यामध्ये ९० साक्षीदार आहेत.

Delhi
2016 JNU sedition case chargesheet file
जेएनयू प्रकरणी चार्जशीट दाखल

दिल्लीच्या जेएनयूमध्ये २०१६ मध्ये लावण्यात आलेल्या देशविरोधी घोषणाबाजी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. आज दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात १२०० पानी चार्जशीट दाखल केली आहे. ही चार्जशीट सेक्शन – १२४ अ, ३२३, ४६५, ४७१, १४३, १४९, १४७, १२० ब अंतर्गत दाखल करण्यात आली आहे. या चार्जशीटमध्ये एकूण १० आरोपींचा समावेश आहे. ज्यामध्ये जेएनयूच्या विद्यार्थी सेनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार, उमर खालिद आणि अनिर्बान भट्टाचार्य आहे. चार्जशीटमध्ये मुख्य आरोपी कन्हैय्या कुमार, अनिर्बान भट्टाचार्य, उमर खालिद, सात काश्मीरचे विद्यार्थी आणि ३६ अन्य जणांचा समावेश आहे.

यांच्याविरोधात चार्जशीट दाखल

दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटनुसार, कन्हैय्या कुमारने देखील देशविरोधी घोषणाबाजी केली होती. पोलिसांना त्यावेळी घोषणाबाजी आणि भाषण देतानाचा कन्हैय्याचा एक व्हिडिओ देखील मिळाला होता. कन्हैय्या कुमार, उमर खालिद,अनिर्बन भट्टाचार्य आणि ७ काश्मिरच्या विद्यार्थ्यांची नावं कॉलम नंबर ११ मध्ये ठेवण्यात आली आहेत. कॉलम नंबर ११ चा अर्थ असा होता की, या आरोपींच्याविरोधात पुरावे असून त्याच्याविरोधात केस चालवू शकतो. बाकी ३६ लोकांची नावं कॉलम नंबर १२ मध्ये ठेवण्यात आली आहे. ज्यामध्ये डी राजा यांची मुलगी अपराजिता आणि शहला राशिद सहभागी आहे. कॉलम नंबर १२चा अर्थ असा होतो की, हे आरोपी आहेत मात्र तपासा दरम्यान पोलिसांना त्यांच्याविरोधात पुरावे नाही मिळाले. कोर्टाला वाटले तर त्यांना समन्स दिला जाऊ शकतो. देशद्रोह, दंगल भडकवणे, अवैधरित्या एकत्र येणे या आरोपावरुन ४६ जणांविरोधात चार्जशीट कोर्टासमोर सादर होणार आहे.

१२०० पानी चार्जशीट

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पुरावे म्हणजे घटनेवेळीचा व्हिडिओ जो सीबीआयच्या सीएफएसएलकडे तपासासाठी पाठवण्यात आला असून त्यांचा निर्णय सकारात्मक आला आहे. त्याचसोबत घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांचे जबाब, मोबाईल फुटेज, फेसबुक पोस्ट, बॅनर पोस्टर यांचा समावेश आहे. त्याचसोबत जेएनयू प्रशआसन, एबीव्हीपीचे विद्यार्थी, सुरक्षा रक्षक आणि काही अन्य विद्यार्थ्यांना साक्षीदार बनवण्यात आले आहेत. याप्रकरणात ३० आणखी लोकं संशयित आहेत. मात्र त्यांच्याविरोधात पुरावे मिळाले नाहीत. पोलिसांनी १२०० पानांची चार्जशीट बनवली आहे यामध्ये ९० साक्षीदार आहेत.

न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास – कन्हैय्या

दरम्यान, याप्रकरणावर कन्हैय्या कुमारने प्रतिक्रिया दिली आहे, त्याने असे म्हटले आहे की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पोलिसांचे आभार मानू इच्छितो. ३ वर्षानंतर निवडणुकीआधी चार्जशीट दाखल करणे यावरुन हे स्पष्ट दिसून येत आहे की, हे राजकारणाशी प्रेरित आहे. मी आपल्या देशाच्या न्याव्यवस्थेवर विश्वास ठेवतो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here