घरदेश-विदेशअहमद पटेल यांचा गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे 'चाणक्य' पर्यंतचा प्रवास

अहमद पटेल यांचा गुजरात युवक काँग्रेसचे अध्यक्ष ते काँग्रेसचे ‘चाणक्य’ पर्यंतचा प्रवास

Subscribe

काँग्रेसचे चाणक्य अशी ओळख असणार अहमद पटेल यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी कोरोनाने निधन झाले. पटेल यांच्या निधनाने काँग्रेसवर शोककळा पसरली आहे. अहमद पटेल यांना केवळ कॉंग्रेसचे ‘चाणक्य’ मानले जात नव्हते, तर ते पक्षाचे ‘संकटमोचक’ देखील होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी पासून ते काँग्रेसच्या विद्यमान अध्यक्षा सोनिया गांधी यांना त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता.

राजकीय वर्तुळात अहमद भाई म्हणून ओळखले जाणारे अहमद पटेल हे केवळ काँग्रेस पक्षाचे मुख्य रणनीतिकार नव्हते, तर पक्षावर आलेल्या मोठ्या संकटाच्या वेळी ते संकट निवारण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नेहमी पडद्यामागून राजकारण करणारे अहमद पटेल गांधी कुटुंबातील अत्यंत निकट आणि विश्वासू नेत्यांमधील होते. सध्याच्या काळात ते थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींशी चर्चा करत असत. अहमद पटेल हे दीर्घ काळ सोनिया गांधींचे राजकीय सचिव होते.

- Advertisement -

अहमद पटेल यांची राजकीय कारकिर्द

अहमद पटेल यांनी वयाच्या २६ व्या वर्षी राजकारणात प्रवेश केला. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्यकाळापासून अहमद पटेल राजकारणात होते. २६ व्या वर्षी राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणारे अहमद पटेल ८ वेळा खासदार राहिले आहेत. संसदेचे वरिष्ठ सभागृह राज्यसभेत ५ वेळा तर लोकसभेत ३ वेळा त्यांनी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले.

काँग्रेसचे संकटमोचक आणि चाणक्य अहमद पटेल यांना ऑगस्ट २०१८ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या कोषाध्यक्षपदी निवडण्यात आले होते. पटेल यांनी इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून काँग्रेसमध्ये संघटनात्मक कमान सांभाळण्याचे मोठे काम केले आहे.

- Advertisement -

पक्षसंघटनेवर भर

१९७७ च्या निवडणुकीत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली होती. त्यावेळी पुलोद सरकार आले होते. ७७ च्या निवडणुकीत कँग्रेसचे मोठा प्रमाणात उमेदवार पराभूत झाले होते. त्यावेळी काँग्रेसच्या मुठभर विजयी उमेदवारांमध्ये अहमद पटेल यांचे नाव होतं. ७७ च्या दारूण पराभवानंतर १९८० मध्ये काँग्रेसने दमदार पुनरागमन केले. ८० साली इंदिरा गांधी अमहद पटेल यांना मंत्रिमंडळात घेण्यास इच्छुक होत्या. पण पटेल यांनी आपण संघटना मजबूत करण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगत पक्षासाठी काम करणे पसंत केले.

१९८० साली मंत्रीमंडळात जाण्यास नकार दिल्यानंतर राजीव गांधी यांनी १९८४ च्या निवडणुकीनंतर पटेल यांना मंत्रिपदाची ऑफर दिली. तेव्हाही पटेल यांनी ते विनम्रपणे नाकारत पक्षासाठी काम करण्यालाच पसंती दिली. राजीव गांधी यांच्या काळात अमहद पटेल यांनी काँग्रेसमध्ये युवकांचे संघटन बांधले. त्याचा मोठा फायदा पुढे सोनिया गांधी यांना झाला.

अहमद पटेल यांचा राजकीय प्रवास

  • अहमद पटेल यांचा जन्मा गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमध्ये झाला.
  • १९७७ ते १९८२ दरम्यान पटेल यांनी गुजरात युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.
  • अहमद पटेल यांनी १९७७ मध्ये पहिली लोकसभा निवडणूक लढवत जवळपास ६२ हजार मतांनी विजयी झाले.
  • १९८० मध्ये त्यांनी ८२ हजार मतांनी विजय मिळवला.
  • १९८४ च्या निवडणुकीत त्यांचा तब्बल १ लाख २३ हजार मतांनी विजय झाला. पुढे १९९३ पासून अहमद पटेल राज्यसभेचे खासदार राहिले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -