घरदेश-विदेशतर UPSC परीक्षा घेण्याचा हेतूच बाद होईल

तर UPSC परीक्षा घेण्याचा हेतूच बाद होईल

Subscribe

युपीएससी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य, युपीएससी मांडली सर्वोच्च न्यायालयात बाजू

केंद्रीय लोकसेवा आयोगाने सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना स्पष्ट केले की लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आणखी पुढे ढकलणे शक्य होणार नाही. खंडपिठाचे मुख्य न्यायमूर्ती ए एम खानविलकर यांनी या प्रकरणात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणातील पुढील सुनावणी आता बुधवारी होणार आहे. युपीएससी परीक्षार्थीनी दाखल केलेल्या प्रकरणात येत्या दिवसातील पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

या प्रकरणात युपीएससीतर्फे बाजू मांडणारे अॅडव्होकेट नरेश कौशिक यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, सद्यस्थितीला पूर्वपरीक्षा पुढे ढकलणे शक्य नाही. आतापर्यंत जितका वेळ ही पूर्वपरीक्षा पुढे ढकलणे शक्य होते तितका वेळ परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र यापुढे परीक्षा पुढे ढकलणे शक्य होणार नाही. त्यामुळे संपुर्ण परीक्षा पद्धतीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. युपीएससीची पूर्वपरीक्षा ही ३० सप्टेंबरला होणे अपेक्षित होते. पण आता ही परीक्षा ४ ऑक्टोबरला होणार आहे. पूर्वपरीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षा घेण्याचा हेतूच बाद होईल असे युपीएससीने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले.

- Advertisement -

नरेश कौशिक यांना एक छोटे प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले असून, या प्रतिज्ञापत्रात परीक्षा पुढे ढकलण्यात का येणार नाही याची कारणे द्या असेही सांगण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार पूरस्थिती, अतिवृष्टी यासारख्या अनेक भागातील प्रकोपामुळे या परीक्षा दोन ते तीन महिने पुढे ढकलण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली होती. सध्या शासकीय पातळीवरही परीक्षा घेण्यासाठी तयारी पुर्ण झालेली नाही. त्यामुळेच स्टॅण्डर्ड ऑपरेटींग प्रोसिजर (एसओपी) अंमलात आणून ही परीक्षा घ्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती. एकुण २० परीक्षार्थींनी एकत्र येऊन ही याचिका दाखल केली होती. देशातील ७२ शहरांमधून सहा लाख परीक्षार्थी ही परीक्षा देणार होते.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -