घरदेश-विदेशतुम्ही पॉवर बँक वापरता का? सावधान!

तुम्ही पॉवर बँक वापरता का? सावधान!

Subscribe

प्रवासात हल्ली चार्जिंग पाईंट शोधण्याची लगबग करणारे अगदी हाताच्या बोटावर दिसतात. कारण आता फोन चार्ज करण्यासाठी पॉवर बँकचा पर्याय सगळ्यांकडे आहे. तुम्ही देखील पॉवर बँक वापरत असाल तर सावधान! आधी हा व्हिडिओ बघा आणि तुमची पॉवर बँक सुरक्षित आहे का ते तपासा…

- Advertisement -

(सौजन्य- साऊथ चायना मार्निंग पोस्ट)

बसमध्ये झाला पॉवर बँकचा स्फोट

चीनमध्ये एका बसमध्ये प्रवास करताना एका माणसाच्या बॅगमध्ये असलेल्या पॉवर बँकचा स्फोट झाला. हा मुलगा बसमध्ये त्याच्या शेजारी असलेल्या मित्रासोबत बोलत होता. पण अचानक त्याच्या बॅगेतून धूर येऊ लागला. धूर कुठून येतोय हे बघायच्या आत त्याच्या बॅगेत स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. प्रसांवधान राखत त्या मुलाने ती बॅग फेकून दिली. हा स्फोट पॉवर बॅंकचा झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने बस खाली उतरुन बॅगला लागलेली आग विझवली. पण बराच वेळ या बॅगेतून धूर येतच होता.  सुदैवाने यात कोणालाही नुकसान झाले नाही. हा सगळा प्रकार बसच्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच झाला होता स्फोट

अगदी काहीच दिवसांपूर्वी भांडुपमध्ये एका हॉटेलमध्ये फोनने खिशातच  पेट घेतला होता. त्यामुळे पुन्हा एकदा स्मार्टफोन्स सुरक्षित आहेत का असा प्रश्न पुन्हा निर्माण  झाला होता.  त्यात आता पॉवर बॅंकची भर पडली आहे. आता पॉवर बॅंक तरी सुरक्षित आहे का? असा प्रश्न पडला आहे.

स्वस्तातल्या पॉवर बॅंकचा सुळसुळाट 

हल्ली गल्लोगल्ली पॉवर बॅंकचा सुळसुळाट आहे. १०० रुपयांपासून या पॉवर बँक मिळतात. पण थोड थांबा अशा स्वस्तातल्या पॉवर बॅंक वापरणे धोक्याचे असू शकते. चांगल्या कंपनीच्या पॉवर बँक खरेदी करा. शिवाय पॉवर बँक वापरताना नेमकी काय खबरदारी घ्यायची ते नक्की बघा.

पॉवर बँक वापरताना घ्या ही काळजी

  • फोनची बॅटरी २० टक्क्यांपेक्षा कमी नसेल तर पॉवर बॅंक वापरु नका
  • प्रत्येक मोबाईलसाठी त्यातील बॅटरी क्षमता बघून पॉवर बँकची निवड करा. या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या
  • पॉवर बॅंकसोबत दिलेल्या चार्जिंग केबलचा वापर करा. तुमच्या फोन चार्जरची  केबल वापरु नका
  • उष्णतेपासून पॉवर बॅंक लांब ठेवा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -