घरदेश-विदेशपटेल यांची ईडीकडून ८ तास चौकशी

पटेल यांची ईडीकडून ८ तास चौकशी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांची शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आठ तासांपेक्षा जास्त वेळ चौकशी केली. येत्या बुधवारी, २३ ऑक्टोबर रोजी पटेल यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे. कुविख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा सहकारी इक्बाल मिर्ची याची मालमत्ता खरेदीसाठी मनी लाँडरिंग केल्याचा आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहे. युपीए सरकारमधील माजी मंत्री प्रफुल्ल पटेल हे शुक्रवारी सकाळी १० वाजता बॅलॉर्ड पिअर येथील ईडीच्या कार्यालयात दाखल झाले.

त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही कार्यकर्ता नव्हता. इक्बाल मिर्चीचा नावे असलेला वरळी तारांगणसमोरील भूखंड पटेल यांच्या कंपनीने खरेदी केल्याच्या मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीकडून प्रफुल्ल पटेल यांची जबानी नोंदवण्यात आली. ईडीच्या अधिकार्‍यांनुसार, पटेल यांच्या मिलिनियम डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २००६-०७ साली वरळीतील नेहरू तारांगणसमोर सीजे हाऊस ही इमारत बांधली. त्यातील तिसरा आणि चौथा मजला इक्बाल मिर्ची याची पत्नी हजरा इक्बाल हिच्या नावे केला.

- Advertisement -

ज्या जागेवर हा टॉवर बांधण्यात आला आहे ती जागा मिर्चीच्या मालकीची असल्याचे म्हटले जाते. ती जागा इक्बाल मिर्चीने मनी लाँडरिंग, अंमली पदार्थांचा व्यापार आणि इतर खंडणीच्या गुन्ह्यातून मिळालेल्या पैशाने खरेदी केली, असा ईडीच्या अधिकार्‍यांचा दावा आहे. मात्र, पटेल आणि त्यांच्या कंपनीने या आरोपाचा इन्कार केला आहे. मालमत्तेची कागदपत्रे हे स्पष्ट करतात की, हा व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक आहे, असा खुलासा पटेल यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -