घरदेश-विदेशकुमारस्वामी सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध करावे - प्रल्हाद जोशी

कुमारस्वामी सरकारने सभागृहात बहुमत सिद्ध करावे – प्रल्हाद जोशी

Subscribe

कर्नाटकामधील राजकीय नाट्य काही केल्या कमी होताना दिसत नाही. बंडखोर आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आले आहे. दरम्यान, भाजपने कुमारस्वामींना बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान केले आहे.

कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष के. आर. रमेश कुमार आणि मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांचे वागणे चुकीचे आहे. व्यक्तिगतपणे आमदारांनी राजीनामा सादर केल्यानंतरही जर रमेश कुमार स्वीकार नसतील तर यामागे काहीतरी राजकीय षडयंत्र नक्कीच आहे, असा आरोप संसदीय कार्यमंत्री आणि कर्नाटक भाजपचे जेष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. कर्नाटकच्या राजकीय घडामोडींवर ते बोलत होते. काँग्रेस-जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला असून सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांनी लवकरात लवकर सभागृहात बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी जोशी यांनी केली आहे.

‘कुमारस्वामींनी राजीनामा देणेच योग्य’

काँग्रेस- जेडीएसच्या १५ बंडखोर आमदारांनी राजीनामा दिला असून दोन माजी मंत्री आणि अपक्ष आमदारही भारतीय जनता पक्षास समर्थन देण्यास तयार आहेत. त्यामुळे नैतिक दृष्ट्या काँग्रेस- जेडीएस आघाडी सरकारने बहुमत गमविले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एच. डी कुमारस्वामी यांनी राजीनामा देणेच योग्य राहील, असे म्हणत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे. मागील आठवड्यात काँग्रेस- जेडीसच्या १३ आमदारांनी राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत आमदारकीचा राजीनामा दिला होता. २२५ सदस्य असलेल्या कर्नाटक विधानसभेत याअगोदर काँग्रेसचे ७९ तर जनता दलचे (सेक्युलर) ३७ आमदार होते. मात्र, आमदारांच्या राजीनाम्यानंतर कुमारस्वामींचे सरकार धोक्यात आले आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटकाच्या बंडखोर आमदारांचे पोलिसांना पत्र; काँग्रेस नेत्यांकडून धोका

हेही वाचा – कर्नाटकचे बंडखोर आमदार पोलीस बंदोबस्तात साईचरणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -