Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश पंतप्रधान मोदींची प्रशासनशैली एकाधिकारशाहीची; प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्रातून तिखट टीका

पंतप्रधान मोदींची प्रशासनशैली एकाधिकारशाहीची; प्रणब मुखर्जी यांच्या आत्मचरित्रातून तिखट टीका

Related Story

- Advertisement -

दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर तिखट शब्दांत टीका केली आहे. पंतप्रधान मोदींची प्रशासनशैली एकतंत्री-एकाधिकारशाहीची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या मताशी सहमत नसलेल्यांचा आवाजही ऐकायला हवा आणि संसदेत अधिक वेळा बोलायला हवं. याशिवाय, मोदी सरकारच्या कारभाराचे विच्छेदन करणाऱ्या अनेक बाबी प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ आत्मचरित्रात मांडल्या आहेत. प्रणब मुखर्जी यांच्या पुस्तकाचा चौथा खंड प्रकाशित झाला आहे.

प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या ‘द प्रेसिडेन्शियल इयर्स’ आत्मचरित्रातून अनेक बाबींवर प्रकाश टाकला आहे. प्रणब मुखर्जी यांनी मोदी सरकार, काँग्रेसवर परखड मत व्यक्त केलं आहे. पहिल्या कारकीर्दीत मोदींची शैली एकतंत्री- एकाधिकारशाहीची होती. मोदी सरकार पहिल्या मुदतीच्या काळात संसद सुरळीतपणे चालवू शकले नाहीत, असं प्रणब मुखर्जी यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे. प्रणब मुखर्जी यांनी नोटाबंदीच्या निर्णयावरही लिहिलं आहे. पंतप्रधान मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर प्रणब मुखर्जींची भेट घेतली होती. मोदींनी निर्णय घेण्यापूर्वी आपल्याशी चर्चा केली नसल्याचं प्रणब मुखर्जी यांनी आत्मचरित्रात नमुद केलं आहे. मोदी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रपती भवनाता प्रणब मुखर्जी यांना भेटायला गेले. मोदींनी या निर्णयामागची कारणे सांगितली. काळा पैसा बाहेर काढणे, भ्रष्टाचाराचा मुकाबला करणे, दहशतवाद्यांचा निधी रोखणे असे तीन उद्देश त्यांनी सांगितले, असं प्रणब मुखर्जी यांनी पुस्तकात म्हटलं आहे. माजी अर्थमंत्री या नात्याने नोटाबंदीच्या निर्णयाला माझा पाठिंबा मागितला होता पण नंतर आपण पाठिंबा देणारे निवेदन तत्त्वत: जारी केलं. पण नोटाबंदीने अपेक्षित परिणाम साध्य होणार नाहीत असंही म्हटलं होतं नंतर चार वर्षांनीही त्यातील कुठलेच परिणाम साध्य झालेले दिसले नाहीत, असं प्रणब मुखर्जी यांनी पुस्तकात म्हटलं आहे.

- Advertisement -

प्रणब मुखर्जी यांनी मोदींना एक सल्लाही दिला होता. पंतप्रधानांचं संसदेत उपस्थित असणं हे त्या संस्थेच्या कार्यपद्धतीवर ठसा उमटवणारं असतं. पंतप्रधान मोदी यांची दुसरी कारकीर्द सुरू झाली. त्यात त्यांनी त्यांच्या पूर्वसुरींकडून संसदेत उपस्थित राहण्याचा व दृश्य नेतृत्व वठवण्याचा प्रयत्न करावा. त्यांनी मतभेदाचे सूर ऐकून घेत संसदेत बोललं पाहिजे, असा सल्ला मुखर्जी यांनी दिला होता. प्रणव मुखर्जी यांनी पुस्तकात लिहिलं आहे की, “जवाहरलाल नेहरू असो वा इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी किंवा मनमोहन सिंग, या सर्वांनी सभागृहात आपली उपस्थिती जाणवून दिली.”

 

- Advertisement -