घरदेश-विदेशथकलेल्या मुख्यमंत्र्यासाठी बिहारने तयार रहावं; प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांवर निशाणा

थकलेल्या मुख्यमंत्र्यासाठी बिहारने तयार रहावं; प्रशांत किशोर यांचा नितीश कुमारांवर निशाणा

Subscribe

बिहारमधील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते आणि जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी सातव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर जनता दल युनायटेड (जेडीयू) चे माजी नेते राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी त्यांना लक्ष्य केले आहे. प्रशांत किशोर यांनी ट्विट करत नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे. थकलेल्या मुख्यमंत्र्यासाठी बिहारने सज्ज व्हायला असे प्रशांत किशोर म्हणाले.

“भाजप नामनिर्देशित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल नितीश कुमार यांचे अभिनिंदन. राज्याला काही वर्षे एका थकलेल्या आणि राजकीयदृष्ट्या महत्वहीन झालेल्या नेत्याच्या प्रभावहीन सरकारसाठी तयार रहायला हवे,” असे ट्विट प्रशांत किशोर यांनी केले आहे.

- Advertisement -

जेडीयू सोडल्यापासून प्रशांत किशोर हे नितीश कुमारांवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. प्रशांत किशोर यांना सप्टेंबर २०१८ मध्ये नितीश कुमार यांनी जेडीयूमध्ये सामील केले होते. त्यावेळी नितीशकुमार यांनी स्पष्ट केले होते की त्यांचे पक्षातील स्थान दुसर्‍या क्रमांकावर असेल. नितीशकुमार यांच्या या निर्णयाबद्दल पक्षात नाराजी होती, परंतु असे असूनही नितीशकुमार प्रशांत किशोर यांना नेहमीच पसंती दिली होती. तथापि, प्रशांत किशोर यांचा जेडीयूमधील प्रवास फार काळ चालला नाही.

नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री

नितीशकुमार यांनी सातव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे प्रदीर्घकाळ सेवा देणारे मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिन्हा यांचा रेकॉर्ड मोडण्याच्या दिशेने नितीश कुमार जात आहेत. जर नितीशकुमार यांनी पाच वर्षे सरकार चालवले आणि मुख्यमंत्री राहिले तर बिहारमधील प्रदीर्घ मुख्यमंत्री होण्याचा विक्रम तो मोडतील. बिहारचे पहिले मुख्यमंत्री श्रीकृष्ण सिन्हा १७ वर्षे ५२ दिवस मुख्यमंत्री होते. नितीशकुमार १४ वर्षे आणि ८२ दिवस बिहारचे मुख्यमंत्री आहेत.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -