अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांची संयुक्त राष्ट्रांत नियुक्ती!

संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे असंसर्गीय आजारासंबंधी काम करण्याबाबत प्रवीण परदेशी यांना महिनाभरापूर्वी ऑफऱ देण्यात आली होती. त्यानंतर परदेशी यांना परवानगी देऊन कार्यमुक्त करण्याबाबत राज्य सरकारने केंद्राला प्रस्ताव पाठवला होता. त्यानुसार केंद्राच्या अपॉईन्मेट कमिटी ऑफ कॅबिनेट ने (एसीसी) परदेशी यांचा हा प्रस्ताव मंजूर केला आहे.

प्रवीण परदेशी सध्या राज्याच्या नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. या आधी ते मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.

कोरोना महामारीमध्ये अचानकपणे परदेशी यांची महापालिकेतून बदली करण्यात आली. त्यामुळे ते नाराज होते. कार्यक्षम IAS अधिकारी म्हणून प्रवीण परदेशी यांचा नावलौकीक आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना परदेशी हे त्यांच्या कार्यलाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. फडणवीस यांचा उजवा हात म्हणून ते ओळखले जायचे.

किल्लारी भूकंपावेळी परदेशी हे लातूरचे जिल्हाधिकारी होते. त्या काळात त्यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली होती. शरद पवार यावेळी मुख्यमंत्री होते. शरद पवारांनी यादेखील अनेकवेळी परदेशी यांचे खूप कौतुक केलं होतं. कोरोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेतून परदेशी यांची बदली झाली.


हे ही वाचा – ‘तर राज्य सोडून द्या’, शिवसेनेच्या मंत्र्याचा अमृता फडणवीसांना टोला