घरट्रेंडिंगअहमदाबादमध्ये झळकतायत 'नमस्ते ट्रम्प'चे पोस्टर!

अहमदाबादमध्ये झळकतायत ‘नमस्ते ट्रम्प’चे पोस्टर!

Subscribe

डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यासाठी येणार आहेत. या निमित्ताने अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर येणार असल्याची बातमी सर्वदूर पसरली असून, हा सगळ्यात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. डोनाल्ड ट्रम्प हे २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी भारत दौऱ्यासाठी येणार आहेत. या निमित्ताने अहमदाबादमध्ये जोरदार तयारी सुरू असल्याचे दिसत आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी देखील कडेकोट बंदोबस्त केला जात आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून २०० सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. या निमित्ताने अहमदाबादच्या रस्त्यावर नमस्ते ट्रम्पचे पोस्टर दिसत आहेत. तसेच मोठ-मोठ्या बॅनर सोबतच अनेक ठिकाणी नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे पेंटिंग्ज दिसत आहेत.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात आला असून, सोमवारी अमेरिकेच्या वायुदलाने हरक्युलिस विमानाच्या मदतीने २०० सुरक्षारक्षक अहमदाबादमध्ये तैनात केले आहेत. या विमानात ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक अनेक वाहनांचा समावेश होता. यात फायर सेफ्टी सिस्टीम आणि स्पाय कॅमेरा यांसारख्या विविध गोष्टींचा यात समावेश आहे. अमेरिका सुरक्षा रक्षक एजन्सीच्या जवानांची ‘मोटेरा स्टेडियम’मध्ये अगोदरपासूनच कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. तसेच भारतीय सुरक्षा संस्थांनी देखील आपली वेगळी कंट्रोल रूम तयार केली आहे.

- Advertisement -

डोनाल्ड ट्रम्प अहमदाबादमध्ये पोहोचण्याच्या तीन तास आधी भारताच्या ‘एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ला अहमदाबाद येथे येणारी सर्व विमानं थांबवण्याचे आदेश दिले जाणार आहेत. तसेच ‘रोड शो’च्या आधी देखील संपूर्ण मार्ग बॉम्ब शोधकपथकाकडून तपासला जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -