घरदेश-विदेश'या' देशात कोरोनाचा सर्वाधिक धोका; फैलाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

‘या’ देशात कोरोनाचा सर्वाधिक धोका; फैलाव रोखण्यासाठी पुन्हा लॉकडाऊनची घोषणा

Subscribe

फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन केला जाहीर

जगभरात कोरोनाचा कहर अद्याप सुरू आहे. अमेरिका आणि ब्रिटननंतर आता आणखीन एका देशात कोरोनाचा धोका वाढत असल्याने या देशातील नागरिक चिंताग्रस्त आहे. दरम्यान, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी बुधवारी कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर देशात दुसऱ्यांदा लॉकडाऊन जाहीर केले. त्यावेळी ते म्हणाले, कोरोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत धोकादायक असू शकते. कठोर उपाययोजना न केल्यास मृतांचा आकडा ४ लाखांवर पोहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोना संसर्गाविरोधात लढण्यासाठी सध्या लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. हा लॉकडाऊन शुक्रवारपासून लागू करण्यात येणार असून तो १ डिसेंबरपर्यंत राहणार आहे. या लॉकडाऊन दरम्यान शाळा आणि काही कार्यालयं सुरू राहणार आहेत. तर सर्व रेस्टॉरंट्स, बार आणि अनावश्यक व्यवसाय बंद राहतील. कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे लॉकडाऊनच्या नवीन गाइडलाइन जाहीर केल्या आहेत. यावेळी सर्व शाळा, सार्वजनिक सेवा आणि आवश्यक कार्यालये खुल्या राहतील.

- Advertisement -

वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी कोरोनामुळे फ्रान्समध्ये ५३० लोकांचा मृत्यू झाला. तर ३३ हजार ४१७ रुग्ण आढळून आले आहेत. फ्रान्समध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा १२ लाखहून अधिक आहे. तर आतापर्यंत ३५ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. १ लाख १३ हजार रुग्ण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत. १० लाखहून अधिक लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत.कोरोनाग्रस्त देशांच्या यादीत फ्रान्सचा ५ वा क्रमांक आहे. अमेरिका आणि ब्राझिलनंतर सर्वाधिक रुग्ण फ्रान्समध्ये सापडले असून रिकव्हरी रेट सर्वात कमी आहे.


३१ ऑक्टोबर रोजी Blue Moon चा दुर्मिळ योग!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -