घरदेश-विदेशकाँग्रेस पक्षाच्या पायाभरणीत पटेल यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली

काँग्रेस पक्षाच्या पायाभरणीत पटेल यांचे मोठे योगदान; पंतप्रधान मोदी, राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली

Subscribe

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे ७१ व्या वर्षी बुधवारी पहाटे निधन झाले. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच बुधवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अहमद पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसवर शोककळा पसरली. पटेल यांच्या निधनानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनीही अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांनी समाजाच्या सेवेसाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. ते त्यांच्या तल्लख बुद्धीसाठी ओळखले जायचे. काँग्रेसला शक्तीशाली पक्ष म्हणून उभे करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायमच लक्षात राहिल असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो, असे मोदींनी म्हटले.

- Advertisement -

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या निधानाने दु:ख झाल्याचे म्हटले आहे. ते एक उत्तम खासदार होते असेही राष्ट्रपतींनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. उत्तम गुण आणि नेतृत्वाचे ते अगदी योग्य उदाहरण होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे प्रत्येक पक्षात मित्र होते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे राष्ट्रपतींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक नेत्यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. “अहमद पटेल पक्षाचा एक स्तंभ होते. ते संपूर्ण आयुष्य काँग्रेसमध्ये जगले. जेव्हा काँग्रेस पक्ष खडतर काळातून जात होता, तेव्हाही ते पक्षासोबत उभे राहिले. ते एखाद्या मौल्यवान संपत्तीसारखे होते. आम्हाला सदैव त्यांची उणीव जाणवत राहिल. या दुःखाच्या प्रसंगी फैजल, मुमताज आणि संपूर्ण कुटुंबासोबत माझ्या सहवेदना आहेत,” असे राहुल गांधी यांनी ट्विट करून म्हटले आहे.

- Advertisement -

प्रियंका गांधी यांनी अहमद पटेल यांच्या मृत्यूमुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचे म्हटले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -