घरट्रेंडिंगएका लग्नासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी बदलला कार्यक्रम!

एका लग्नासाठी भारताच्या राष्ट्रपतींनी बदलला कार्यक्रम!

Subscribe

ट्वीटरमुळे कोचीमध्ये लग्न प्लॅन केलेल्या एका अमेरिकन दाम्पत्याला राष्ट्रपती भवनाकडून थेट दिलासा मिळाला आहे!

लग्न म्हणजे त्यासाठीची सतराशे कामं आलीच. शिवाय एवढा मोठा कार्यक्रम म्हटल्यावर त्याची तयारी बरेच दिवस आधीपासून सुरू होते. त्यातच मोठं लग्न करायचं असल्यास, त्याची तयारीही मोठीच असते. एका अमेरिकी दाम्पत्याने अशाच प्रकारे आपल्या लग्नासाठी ८ महिन्यांपासून तयारी केली होती. कोचीनमध्ये लग्नासाठी सुंदर अशा ‘हॉटेल ताज विवांता’मध्ये रुम्सदेखील बुक झाल्या होत्या. सगळं काही सज्ज होतं. अवघ्या २ दिवसांवर लग्न येऊन ठेपलं होतं. पण तेवढ्यात त्यांना कळलं की त्यांनी ज्या हॉटेलमध्ये लग्न आणि पाहुण्यांच्या राहण्याची सोय केली होती, त्या हॉटेलमध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद नेमके त्यांच्या लग्नाच्याच दिवशी म्हणजे ७ जानेवारीला, म्हणजेच आज थांबणार आहेत. त्यामुळे त्यांना ऐनवेळी सगळी व्यवस्था दुसरीकडे करण्यासाठी सांगण्यात आलं. या दाम्पत्याच्या सगळ्या तयारीवरच पाणी फिरणार होतं!

ट्वीटरने केली कमाल!

८ महिन्यांपासून केलेली तयारी अवघ्या २ दिवसांमध्ये पुन्हा दुसरीकडे कशी करणार या चिंतेमध्ये अमेरिकेतले अॅशले हॉल पडले होते. त्यातच त्यांनी आपली कैफियत ट्वीटरवर मांडली.

- Advertisement -

त्यासोबतच त्यांनी भारतातील राष्ट्रपती भवनच्या ट्वीटर हँडलला टॅग करून आपलं म्हणणं त्यांच्यासमोरदेखील मांडलं.

- Advertisement -

राष्ट्रपती भवनकडून काही पावलं उचलण्याची शक्यता त्यांना आधी वाटलीच नव्हती. मात्र, अचानक त्यांना हॉटेल प्रशासनाकडून सांगण्यात आलं की ‘आता समस्या सुटली आहे, तुमचा कार्यक्रम तुम्ही पूर्वनियोजित पद्धतीनेच करू शकता’. हे पाहून त्यांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. ७ जानेवारी रोजी त्यांचं लग्न होतं आणि ५ जानेवारी रोजी त्यांना समस्या सुटल्याचं सांगण्यात आलं. त्याच दिवशी रात्री थेट राष्ट्रपती भवनाकडून देखील त्यांना ट्वीटरवर अभिनंदन करण्यात आलं.

नक्की झालं काय?

नौदलाच्या एका कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद ६ आणि ७ जानेवारी असे दोन दिवस तिरुअनंतपुरममध्ये होते. यादरम्यान ते हॉटेल ताज विवांतामध्ये थांबून ७ जानेवारीला संध्याकाळी दिल्लीला परतणार होते. मात्र, हॉल यांचं लग्न देखील ७ जानेवारीलाच असल्याचं लक्षात आल्यानंतर, राष्ट्रपतींनी त्यांचा कार्यक्रम बदलला आणि ७ तारखेला संध्याकाळऐवजी सकाळीच दिल्लीला निघण्याचं ठरवलं. यामुळे संध्याकाळच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -