घरदेश-विदेशराष्ट्रपती भवनात यावर्षी इफ्तार पार्टी होणार नाही

राष्ट्रपती भवनात यावर्षी इफ्तार पार्टी होणार नाही

Subscribe

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यावर्षी राष्ट्रपती भवनमध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन करणार नाहीत. करदात्यांच्या पैशातून राष्ट्रपती भवनात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होणार नाही, असा निर्णय पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपतींनी घेतला होता, अशी माहिती राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आली आहे. हा नियम दिवाळी, होळी, गुरुपोर्णिमा आणि नाताळ या सणांवर देखील लागू होणार आहे.

कोविंद धार्मिक सणाला देशवासियांना शुभेच्छा देतात

- Advertisement -

राष्ट्रपती भवन धर्मनिरपेक्ष भावना जोपासते. या भावनेतूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे राष्ट्रपती भवनातून सांगण्यात आले आहे. यापूर्वी राष्ट्रपती भवनामध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन होत होते, माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी देखील दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन करत होते. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रत्येक धार्मिक सणाला देशवासियांना शुभेच्छा देतात. मात्र धार्मिक सण राष्ट्रपती भवनात साजरा होणार नाही.

अब्दुल कलाम यांनी इफ्तार पार्टीवर आणली होती बंदी

- Advertisement -

माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी मात्र ही परंपरा कधीच पाळली नव्हती. २००२ मध्ये माजी राष्ट्राध्यक्ष अब्दुल कलाम यांच्या काळात प्रथमच इफ्तार पार्टीवर बंदी घालण्यात आली होती. कलाम यांनी त्यांच्या पाच वर्षाच्या कार्यकाळात राष्ट्रपती भवनात कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले नव्हते. त्यांनी इफ्तार पार्टीवर होणारा खर्च गरीब आणि अनाथांना मदत म्हणून दिला होता.

व्हाइट हाऊसमध्ये देखील पहिल्यांदा इफ्तार पार्टी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पहिल्यांदाच इफ्तार पार्टीचे आयोजन केले आहे. पण ट्रम्प यांच्या मुस्लीम विरोधी वक्यव्यामुळे अनेक मुस्लीम संघटनांनी त्यांच्या या इफ्तार पार्टीवर बहिष्कार टाकला आहे. मागच्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही दशकापासून परंपरागत सुरू असलेल्या इफ्तार पार्टीवर बंद आणली होती. १९९० मध्ये बिल क्लिंटन यांनी औपचारिकरित्या या इफ्तार पार्टीची सुरूवात केली होती

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -