कलम ३७०चा निर्णय खोऱ्यातल्या नागरिकांसाठी फायद्याचा – राष्ट्रपती

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना उद्देशून केलेल्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कलम ३७०चा निर्णय काश्मीरमधील नागरिकांसाठी फायदेशीर ठरेल, असं म्हणत त्याचा

New Delhi
president ramnath kovind
राष्ट्रपती रामनाथ कोविंद

कलम ३७० हटवून जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्याच्या निर्णयावर देशभरात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या बदलाची प्रशंसा केली आहे. ‘जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये नुकतेच करण्यात आलेले बदल हे त्या प्रदेशांसाठी फार फायद्याचे ठरणार आहेत. या बदलांमुळे या भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना इतर भारतीयांप्रमाणेच समान हक्क, समान संधी आणि समान सुविधा मिळतील’, असं राष्ट्पती रामनाथ कोविंद म्हणाले आहेत. ७३व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना उद्देशून केलेल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी इतर मुद्द्यांसोबतच कलम ३७०च्या मुद्द्यावर देखील भाष्य केलं.