घरदेश-विदेशपत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; लवकरच कायदा लागू होणार

पत्रकार संरक्षण कायद्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी; लवकरच कायदा लागू होणार

Subscribe

जवळपास अडीच वर्षे राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पडून असलेले पत्रकार संरक्षण कायद्याच्या विधेयकावर अखेर राष्ट्रपतींनी २८ ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी केली.

महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांसाठी आनंदाची बातमी आहे. जवळपास अडीच वर्षे राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पडून असलेले पत्रकार संरक्षण कायद्याच्या विधेयकावर अखेर राष्ट्रपतींनी २८ ऑक्टोबर रोजी स्वाक्षरी केली असून ते विधेयक आता राज्यपालांमार्फत मंत्रालयात आले आहे. त्यामुळे आता पत्रकार संरक्षण कायद्याच्या मार्गाातील सर्व अडथले दूर झाले असून येत्या दोन-चार दिवसात यासंबंधीचे नोटिफिकेशन निघेल आणि हा कायदा महाराष्ट्रात लागू होईल.

पत्रकार संरक्षण कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य आहे. हा कायदा व्हावा यासाठी राज्यातील पत्रकारांनी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली दीर्घकालिन लढा दिला होता. त्यानंतर ७ एप्रिल २०१७ रोजी राज्याच्या दोन्ही सभागृहाने कोणतीही चर्चा न करता पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक पारित केले होते. त्यानंतर स्वाक्षरीसाठी ते राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले होते. त्यावर आता स्वाक्षरी झाल्याने या विधेयकाचे रूपांतर कायद्यात झालेले आहे.

- Advertisement -

पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्यव विश्‍वस्त एस. एम. देशमुख आणि विश्‍वस्त किरण नाईक यांनी पत्रकारांच्या लढयास मिळालेल्या यशाबद्दल राज्यातील तमाम पत्रकारांचे अभिनंंदन केले आहे. तसेच सरकारला देखील धन्यवाद दिले आहेत.

हेही वाचा –

भाजप – शिवसेनेचा तिढा सुटणार?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -