फेसबुकवर ‘नंबर वन’ नेते बनले पंतप्रधान मोदी

नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे.

Mumbai
Indian Prime Minister Narendra Modi speaks on stage during a town hall at Facebook's headquarters in Menlo Park, California September 27, 2015. REUTERS/Stephen Lam

नरेंद्र मोदी यांनी फेसबुकवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो यांनी मागे टाकत फेसबुकवर सर्वाधिक लोकप्रिय नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. २०१९ वर्ल्डस् लीडर ऑन फेसबुक अहवालानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजला ४.३५ कोटी लाईक्स मिळाल्या असून त्यांच्याशी जोडलेल्या संबधित इतर पेजला जवळपास १.३७ कोटी लाईक्स मिळाल्या आहेत.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत सोशल मिडीयाचा प्रभावी वापर केल्याने नरेंद्र मोदी यांना देशात सत्ता मिळवता आली. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान बनविण्यात सोशल मिडीयाचा सर्वाधिक हातभार आहे. अनेक वर्षानंतर नरेंद्र मोदींवर विश्वास टाकत जनतेने प्रचंड बहुमत देत मोदी सरकार निवडून दिली. सोशल मिडीयावर नरेंद्र मोदींना फॉलो करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहेच, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानावे आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे.

असा तयार केला जातो अहवाल

फेसबुकच्या काउंडटैंगल टूलच्या सहाय्याने ९६२ फेसबुक पेजचे एक्टिविटीचे विश्लेषण करण्यात येते. ज्या पेजचे सर्वेक्षण केले जाते. त्यामध्ये देशातील प्रमुख व्यक्ती किंवा त्यांचे सरकार यांचा समावेश असतो.

नरेंद्र मोदींनंतर डोनाल्ड ट्रम्प

वर्ल्ड लीडर ऑन फेसबुकने दिलेल्या अहवालानुसार, नरेंद्र मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा क्रमांक लागतो. डोनाल्ड ट्रम्प यांच्या फेसबुक पेजला २.३० कोटी लाईक्स मिळाल्या आहेत. हा अहवाल दरवर्षी तयार केला जातो. तर या अहवालानुसार ब्राझीलचे नवे राष्ट्रपती जायर बोल्सोनारो फेसबुकवर सर्वाधिक वेळ देत असल्याचे सांगण्यात आले आहे.