पंतप्रधान दिवाळी साजरी करण्यासाठी केदारनाथला पोहचले

पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहचले असून तिथे पुजा करणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहे

Mumbai
Narendra Modi arrives in Kedarnath
नरेंद्र मोदी केदारनाथला पोहचले

देशभरामध्ये दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील केदारनाथमध्ये दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी ते बुधवारी सकाळी उत्तराखंडची राजधानी देहराडूनला आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात पोहचले असून तिथे पुजा करणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी दिवाळी साजरी करणार आहे. ते झाल्यानंतर केदारपुरीमध्ये सुरु असलेल्या पुनर्विकास कामकाजाची पहाणी करणार आहेत. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाच पुनर्विकास कामांची सुरुवात झाली होती. पाच वर्षापूर्वी नैसर्गिक आपत्तीमुळे केदारनाथच्या अनेक भागांचे मोठे नुकसान झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या चार वर्षाप्रमाणे यावर्षी देखील जवानांना भेटून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणार आहे.

केदारनाथमध्ये दिवाळी

रुद्रप्रयागचे कलेक्टर मंगेश घिल्डियाल यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथ धामला येणार असून केदारनाथाचे दर्शन घेऊन पुजा करणार आहेत. त्यानंतर दोन तास मोदी इथेच थांबणार आहे. त्यानंतर ते मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर जाणार आहे. शनिवार आणि रविवारमध्ये केदारनाथला झालेल्या बर्फवृष्टीमुळे प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. मंदिर परिसर आणि रस्त्यावरील बर्फ हटवण्याचे काम सुरु आहे.

५ व्यांदा जवानांसोबत दिवाळी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सीमेवर तैनात असलेल्या लष्कराचे जवान आणि आईटीबीपीच्या जवानांच्यासोबत दिवाळी साजरा करणार आहेत. उत्तराखंडातील हर्षिल बॉर्डरवर जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. यावेळेस त्यांच्यासोबत लष्कर प्रमुख बिपिन रावत आणि सैन्याचे अन्य अधिकारीदेखील हजर असतील. हर्षिल बॉर्डर हे भारत-चीन सीमारेषेपासून ४५ किलोमीटर अंतरावर आहे.  २०१७ मध्ये दिवाळीच्या दिवशी काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये त्यांनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्याआधी २०१४ मध्ये सियाचिन, २०१५ मध्ये डोगराई वार मेमोरियल आणि २०१६ मध्ये हिमाचलमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती.

नेतन्याहू यांनी दिल्या शुभेच्छा

इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतांच्या नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, इजराइलच्या लोकांच्यावतीने मी माझे लाडके मित्र नरेंद्र मोदी आणि भारताच्या लोकांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊ इच्छित आहे. रोशनाईच्या या चमकदार सणांने तुम्हाला आनंद आणि समृध्दी मिळो. आम्हाला खूप आनंद होईल जर तुम्ही या ट्विटरचे उत्तर त्या शहाराच्या नावाने द्या जिथे तुम्ही सण साजरा करत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here