घरदेश-विदेशपंतप्रधान नरेंद्र मोदी ६८व्या वाढदिवशी मतदारसंघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी ६८व्या वाढदिवशी मतदारसंघात

Subscribe

भारताचे १४ वे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज ६८ वा वाढदिवस आहे. आजचा दिवस ते आपल्या मतदारंघातील म्हणजेच वाराणसीमधील लहान मुलांसोबत घालवणार आहेत. नरुर गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांशी ते संवाद साधणार आहेत. ही शाळा स्वयंसेवी संस्थेद्वारे चालवण्यात येते. या विद्यार्थ्यांसोबत मोदीजी त्यांच्या जीवनावर आधारीत ‘चलो जीते है’ ही शॉर्टफिल्म देखील पाहणार आहेत. त्यानंतर महात्मा गांधी काशी विद्यापीठातील विद्यार्थी आणि काही शाळकरी मुलांची भेट घेऊन त्यांच्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी पहिल्यांदाच मतदारसंघात आपला वाढदिवस साजरा करत आहेत. यासोबतच भाजपतर्फे देशातील ६८ ठिकाणी प्रत्येकी ६८ किलोचा केक कापला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

पंतप्रधान आजपासून उत्तर प्रदेशच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आहेत. आज दुपारपर्यंत ते नरुर गावात पोहोचतील. विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याबरोबरच काशी विश्वनाथ मंदिरात भगवान शंकराचे दर्शन घेणार आहेत. तसेच ५०० कोटींच्या विकासकामांचे उदघाटनही मोदी यांच्याहस्ते होणार आहे.

- Advertisement -

गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी आपला वाढदिवस गुजरातमध्ये साजरा केला होता. यावर्षी पहिल्यांदाच ते आपल्या मतदारसंघात वाढदिवसानिमित्त उपस्थित राहत आहेत. मोदी यांच्या दोन दिवसीय दौऱ्यात ज्या स्थळांचा समावेश आहे, ती सर्व आगामी निवडणुकांसाठी फायदेशीर ठरतील अशा अटकळी बांधल्या जात आहेत. मोदी स्वतःचा मतदारसंघ राखण्यासोबतच भाजप पक्षाला उत्तर प्रदेशात आगामी लोकसभेला चांगले यश मिळावे, याकडे लक्ष देतील. उत्तर प्रदेश राज्यात लोकसभेच्या ८० जागा आहेत. २०१४ सालच्या निवडणुकात भाजपने ७० हून अधिक जागा जिंकल्या होत्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -