सीमेवर असलेल्या जवानांच्या मागे देश उभा आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

narendra modi

कोरोना व्हायरस संकटाच्या दरम्यान आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘विशिष्ट वातावरणात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. कोरोना पण आहे आणि कर्तव्यही आहे.’ भारत-चीन सीमेवरील तणावाच्या मुद्द्यावर मोदी म्हणाले की, ‘सीमेवर असलेल्या जवानांच्या मागे देश उभा आहे.’

काय म्हणाले नरेंद्र मोदी?

मोदी म्हणाले की, ‘विशिष्ट वातावरणात संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. संकट काळातही खासदारांनी कर्तव्याचे भान ठेवले आहे. यामुळे सर्व खासदार शुभेच्छा देता आणि स्वागत करतो. अधिवेशात महत्त्वाची चर्चा आणि निर्णय होतील. संसदेच्या या महान परंपरेला बाधा येणार नाही. तसेच यावेळेस कोरोनामुळे काही नियमांचे पालन करावे लागणार आहे. दरम्यान जगात कुठेही कोरोनाचे औषध यावे अशी इच्छा आहे. कोरोनाच्या औषधांवर आपले शास्त्रज्ञ देखील प्रयत्न करत आहे.’

भारत-चीन सीमेवरील मुद्द्यावर म्हणाले की, ‘आपल्यासाठी देशाच्या सीमेवर आपले जवान मोठ्या हिमतीने तैनात आहे. जवान दुर्गम भागात देशाच्या संरक्षणासाठी उभे आहेत. विपरित परिस्थितीमध्ये ते देशाची सेवा करत आहे. अशा परिस्थिती संसदचे सर्व सदस्य जवानांच्या मागे उभे असल्याचा संदेश देईल.’