Monday, March 1, 2021
27 C
Mumbai
घर ट्रेंडिंग Video: माथेफिरुंनी फेकला हत्तीच्या अंगावर जळता टायर, उपचारादरम्यान हत्तीचा मृत्यू

Video: माथेफिरुंनी फेकला हत्तीच्या अंगावर जळता टायर, उपचारादरम्यान हत्तीचा मृत्यू

मस्तीत फेकलेला टायरमुळे एका मुक्या प्राण्याला आपला प्राण गमवावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

Related Story

- Advertisement -

तमिळनाडूच्या निलगिरी येथून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. काही माथेफिरुंनी एका हत्तीच्या अंगावर जळता टायर टाकला. या टायरमुळे हत्ती गंभीररित्या जखमी झाला. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याला झालेल्या जखमा इतक्या गंभीर होत्या की उपचारादरम्यानच हत्तीचा मृत्यू झाला. मस्तीत फेकलेला टायरमुळे एका मुक्या प्राण्याला आपला प्राण गमवावा लागला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

- Advertisement -

तमिळनाडूच्या निलगिरी येथील एका प्राइव्हेट रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी जळता टायर फेकला. रिसॉर्टच्या खाली फिरत असलेल्या एका हत्तीच्या अंगावर तो जळता टायर पडला. पडलेला टायर थेट हत्तीच्या कानात जाऊन अडकला. घाबरलेला हत्ती सैरावैरा पळून सोंडेने कानात अडकलेला जळता टायर बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. मसिनागुडी येथील काही वन अधिकाऱ्यांनी हा सगळा प्रकार पाहिला. ते जेव्हा हत्तीच्या जवळ पोहचले तेव्हा हत्तीच्या कानातून भळाभळा रक्त वाहत होते. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगतले.

हत्तीच्या अंगावर जळता टायर टाकणाऱ्या प्राइव्हेट रिसॉर्टच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. जळता टायर हत्तीच्या अंगावर टाकून दोघांनीही तिथून पळ काढला होता. रिसॉर्टच्या दोन्ही कर्मचाऱ्यांना आणि रिसॉर्टच्या मालकांला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. मुक्या प्राण्याला जाणून बुजून मारल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मरण पावलेल्या हत्तीबद्दल नेटकरी हळहळ व्यक्त करत आहेत.


- Advertisement -

हेही वाचा – भारतीय थाळी खाण्यात पाकिस्तान आणि इस्राईल पुढे

 

- Advertisement -