घरट्रेंडिंग'इअर इन सर्च'मध्ये प्रिया वॉरियर गुगलवर हिट

‘इअर इन सर्च’मध्ये प्रिया वॉरियर गुगलवर हिट

Subscribe

यंदाच्या 'इअर इन सर्च'मध्ये प्रिया वॉरियर गुगलवर अव्वल ठरली आहे. अनेक नामांकित अभिनेत्यांना पाठी टाकत प्रियाने सोडलेला नजरेचा बाण गुगलने चांगलाच पकडला आहे.

नजरेने तरुणांना घायाळ करुन सोडणारी मल्याळी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नजरेच्या बाणानं सोडलेला बाण तरुणाच्या हृदयावर जाऊन भिडणारा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर प्रिया वॉरियर चर्चेत आली आणि तिला एक वेगळीच ओळख देऊन गेली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी गुगलवर प्रिया प्रकाश वॉरियर असे नाव सर्च केले होते आणि त्यामुळे यंदाच्या ‘इअर इन सर्च’मध्ये प्रिया वॉरियर गुगलवर चांगलीच हिट झाली आहे. गुगल सर्चमध्ये प्रियाने अभिनेत्री प्रियांका चोप्रा, अभिनेता सलमान खान या स्टार अभिनेत्यांना देखील मागं टाकून प्रिया वॉरियर अव्वल ठरली आहे.

- Advertisement -

हे आहेत गुगलवर सर्च होणारे अॅक्टर

गुगल ‘इअर इन सर्च’मध्ये प्रिया पहिल्या स्थानावर असून तिच्या पाठोपाठ प्रियांका चोप्राचा पती निक जोनास या दुसऱ्या स्थानकावर आहे. तर निक जोनस नंतर गायिका सपना चौधरी, प्रियांका चोप्रा, सोमन कपूरचा पती आनंद अहुजा. अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, अभिनेता सलमान खान, अभिनेत्री मेगन मर्केल, भजन गायक अनुप जलोटा आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा पती बोनी कपूर यांचा क्रमांक लागतो. जागतिक स्तरावरचा विचार केला तर मर्केल पहिल्या स्थानकावर आहे.

ही गाणी सर्वाधिक सर्च केली

तसेच गुगलवर अभिनेत्यांची ज्याप्रमाणे नाव सर्च केली गेली त्याप्रमाणे गाणी देखील सर्च करण्यात आली आहेत. गाणी सर्च करण्यामध्ये नेहा ककरचं ‘दिलबर – दिलबर’, अरिजित सिंहचं ‘तेरा फितूर’ आणि आतिफ अस्लमचं ‘देखते – देखते’ ही गाणी सर्वाधिक सर्च करण्यात आली आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -