फक्त लढ म्हणा!; प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

एक्झिट पोलच्या आकड्यांवर नाराज होऊ नका, असे आवाहन प्रियंका गांधी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केले आहे.

New Delhi
priyanka gandhi advises party workers not to fall for rumours
फक्त लढ म्हणा!; प्रियंका गांधींचे कार्यकर्त्यांना आवाहन

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर रविवारी संध्याकाळी एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार विजयाचे पारडे एनडीएच्या दिशेला झुकणारे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोदी सरकार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी या संदर्भात आपल्या कार्यकर्त्यांना एक्झिट पोलचे आकडेवारी ऐकून खडून न जाण्याचे आवाहन केले आहे. सध्या चुकीचे आणि नकारात्मक वातावरण निर्माण केले जात असल्याचे प्रियंका गांधी आपल्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या आहेत.

नेमकं काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

एका ऑडीयोमार्फत प्रियंका गांधी यांनी आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. या ऑडीओमध्ये प्रियंका कार्यकर्त्यांना एक्झिट पोलचे आकडेवारी पाहून खचून न जाण्याचे आवाहन केले आहे. प्रियंका गांधी म्हणाल्या की, प्रिय बंधू आणि बघिनींनो एक्झिट पोलची आकडेवारी पाहून खचून जाऊ नका. तुमच्या मनोबलाचे खच्चीकरन करण्यासाठी अशाप्रकारचे वातावरण निर्माण केले जात आहे. सतर्क राहा आणि मतमोजनी केंद्राच्या बाहेर काही गैरप्रकार होऊ नये म्हणून उभे राहा. मला विश्वास आहे, आपल्याला नक्की विजय मिळेल.