घरदेश-विदेश'माझ्या भावाची काळजी घ्या'; प्रियंका गांधींचे भावनिक आवाहन

‘माझ्या भावाची काळजी घ्या’; प्रियंका गांधींचे भावनिक आवाहन

Subscribe

राहुल गांधी यांनी केरळच्या वायनाड मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरला आहे. दरम्यान, वायनाड येथील रोड शो प्रियंका गांधी यांनी लोकांना भावनिक आवाहन केले आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केरळच्या वायनाड या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीचा अर्ज भरला आहे. यावेळी राहुल गांधींसोबत त्यांची बहीण आणि काँग्रसच्या सरचिटणीस प्रियंका गांधीदेखील आल्या होत्या. उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर वायनड येथे प्रचारसभेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रचारसभेदरम्यान वायनाडकरांना संबोधित करताना प्रियंका गांधी यांनी भावनिक आवाहन केले आहे. ‘माझ्या भावाची काळजी घ्या’, असे प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत.

हेही वाचा – राहुल गांधींच्या रोड शोदरम्यान तीन पत्रकार जखमी

- Advertisement -

नेमकं काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘मतदारांनो माझ्या भावाची काळजी घ्या. तो खूप धाडसी आहे. तो तुमची नक्की काळजी घेईल. माझा भाऊ माझा खरा मित्र आहे. आतापर्यंत मी ज्यांना भेटले, त्यापैकी माझा भाऊ फार धाडसी आहे. वायनाडकरांनो त्याची काळजी घ्या. तो तुम्हाला कधीही निराश करणार नाही.’

राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार

राहुल गांधी दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशमधील अमेठी मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत. त्यासोबतच केरळच्या वायनाड मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -