घरदेश-विदेशप्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री; काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती

प्रियंका गांधींची राजकारणात एन्ट्री; काँग्रेस सरचिटणीस पदी नियुक्ती

Subscribe

प्रियंका गांधीची नियुक्ती पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचं नेतृत्व ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. प्रियंका गांधी या अखेर राजकारणामध्ये सक्रिय झाल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पक्षाची मोठी जबाबदारी दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधींची काँग्रेसच्या सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. त्याचसोबत प्रियंका गांधीची नियुक्ती पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेश पश्चिमचं नेतृत्व ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रियंका गांधी पदभार स्विकारणार आहेत. तर काँग्रेसने उत्तरप्रदेशचे प्रभारी असलेल्या गुलाम नबी आझाद यांना काढून त्यांना हरियाणाचे प्रभारी बनवले.

- Advertisement -

प्रियांका गांधी आतापर्यंत सक्रीय राजकारणापासून दूर होत्या. त्यांच्याकडे काँग्रेसमधले कोणतंही पद नव्हते. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या निवडणुक प्रचारा दरम्यान त्या अनेकदा दिसल्या. मात्र, आता त्या राजकारणात अधिकृतरित्या सक्रिय झाल्या आहेत. आता राजकीयदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या असलेल्या उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -