प्रियांका गांधींची ट्विटरवर ‘एंट्री’!

प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात असून दरम्यान त्यांनी त्यांच ऑफिशियल ट्विटर अकाऊंटही जनतेसमोर आणलं आहे.

Mumbai
priyanka on twitter
प्रियांका गांधी ट्विटरवर

राजकारणात सक्रिय होत असतानाच प्रियांका गांधी आता सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह होताना दिसत आहे. आज प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जात असून दरम्यान त्यांनी त्यांच ऑफिशियल ट्विटर अकाऊंटही जनतेसमोर आणलं आहे. ट्विटरवर एंट्री घेताच तब्बल ४० हजार युजर्सने त्यांच्या अकाऊंटला फॉलो केलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासोबत सोशल मीडियावरही प्रियांका गांधी सर्वाधिक लोकप्रिय ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे. ट्विटरवर एकही ट्विट न करता सुरू करण्यात आलेले हे ट्विटर अकाउंट व्हेरिफाइड आहे.

राहुल गांधीही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह

प्रियांका आतापर्यंत सक्रिय राजकारण आणि सोशल मीडियापासून दूरच होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांच्या खांद्यावर सरचिटणीसपद आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. या राजकीय एंट्रीनंतर आता त्यांची सोशल मीडियावर दमदार एंट्री झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची सोशल मीडियावर सक्रियता वाढली आहे. त्यांच्या प्रमाणेच प्रियांका देखील पंतप्रधान मोदी यांच्यावर ट्विटरद्वार निशाणा साधणार असे बोलले जात आहे.

रोड शोला प्रतिसाद

दरम्यान, काँग्रसेच्या सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून उत्तर दौऱ्यावर असून त्यांच्या भव्य रोड शो लखनऊमध्ये काढला जात आहे. यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसोबत, राज बब्बर, ज्योतिरादित्य सिंधियासह इतर नेते उपस्थित आहेत. विमानतळापासून सुरु झालेला हा रोड शो तब्बल १५ किलोमीटरपर्यंतचा टप्पा पार करणार आहे. प्रियांका गांधी यांच्या येण्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वेगळाच उत्साह संचारला असून नाचत-गातं, ढोलताशा वाजवून ते आपला आनंद व्यक्त करत आहेत. लखनऊ विमानतळ ते काँग्रेस प्रदेश मुख्यालयापर्यंतचा प्रियांकांचा हा १५ किमीचा रोड शो आहे. काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांसह लखनऊमधील स्थानिकांमध्येही रोड शोबाबतचा उत्साह पाहायला मिळत आहे.

हेही वाचा –

मोदींना रावण तर राहुलला बनवले राम; काँग्रेसची पोस्टरबाजी

राहुल गांधींवरही बनतोय सिनेमा

जेव्हा राहुल गांधी हे मोदींच्या भाषणाची नक्कल करतात