घरदेश-विदेशचुकलंच! पंतप्रधानपदी अमिताभ बच्चन यांना निवडून द्यायला हवं होतं - प्रियंका गांधी

चुकलंच! पंतप्रधानपदी अमिताभ बच्चन यांना निवडून द्यायला हवं होतं – प्रियंका गांधी

Subscribe

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सातव्या टप्प्याच्या शेवटच्या प्रचारसभेत शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावरून नवी चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकांसाठीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार शुक्रवारी संध्याकाळी संपला. हा शेवटचा टप्पा असल्यामुळे आता लोकसभेचा एकंदरीत सर्वच प्रचार थांबला आहे. मात्र शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘२०१४मध्ये मोदींच्या ऐवजी अमिताभ बच्चन यांना तरी निवडून द्यायचं होतं’, असं प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या. मिर्झापूरमध्ये प्रियंका गांधींची शेवटची प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

काय म्हणाल्या प्रियंका गांधी?

एएनआय या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार प्रियंका म्हणाल्या, ‘तुम्ही आता हे समजून घ्या की जगातल्या सर्वात मोठ्या अभिनेत्याला तुम्ही आपला पंतप्रधान म्हणून निवडून दिलं आहे. याहून चांगलं तर तुम्ही अमिताभ बच्चन यांना तरी निवडून द्यायचं होतं. हेही अभिनय करतात, तेही अभिनय करतात. पंतप्रधान म्हणून तसंही यांना काही काम करायचंच नव्हतं. मग ते काय वाईट होते?’ असं प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगू लागली आहे.

- Advertisement -

‘मोदींनी आश्वासनं पाळली नाहीत’

दरम्यान, यावेळी बोलताना प्रियंका गांधींनी भाजपवर देखील टीका केली. ‘भाजपला फक्त सत्ता हवी आहे. मोदींनी मागच्या निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. त्याउलट काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहणारा पक्ष आहे. आम्ही कधीही खोटी आश्वासनं दिली नाहीत’, असं प्रियंका म्हणाल्या. मिर्झापूरमधले काँग्रेसचे उमेदवार ललितेश त्रिपाठी यांच्या प्रचारासाठी त्या आल्या होत्या.

- Advertisement -

हेही वाचा – ‘मला कठीण प्रश्न विचारता, तसेच मोदींनाही विचारा’

आता प्रियंका गांधींच्या या वक्तव्यानंतर नेटिझन्सनी चर्चा सुरू केली आहे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -